Will BJP lose Akola mayor post after Prakash Ambedkar intervention : अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात उतरलेत.. त्यांनी भाजपविरोधकांची मोट बांधून नवी रणनीती आखलीय.. ही रणनीती नेमकी काय आहे.. आणि अकोल्यात कोण किंगमेकर ठरणार? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.....
अकोला महापालिकेच्या सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट आलाय. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही भाजपची महापौरपदाची संधी हुकण्याची शक्यता आहे...कारण भाजपला रोखण्यासाठी थेट प्रकाश आंबेडकर मैदानात उतरलेत...
हा व्हिडीओ पाहा... अकोला महापालिकेत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही... त्यापार्श्वभुमीवर भाजपनं सत्तेसाठी गणित जुळवायला सुरुवात केली होती.. मात्र आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस, एमआयएम, वंचित आणि ठाकरेसेनाच नाही तर दोन्ही राष्ट्रवादीचीही मोट बांधत डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं होतं.. याच बैठकीत आंबेडकरांनी सर्वांना सोबत घेऊन भाजपला रोखण्याची रणनीती आखलीय...
एका बाजूला अशी रणनीती आखली जात असताना दुसरीकडेच महापौरपदावरुन वंचित आणि ठाकरेसेनेमध्ये रस्सीखेच रंगलीय.. भाजपला रोखण्यासाठी ठाकरेसेनेनं आपल्यालाच महापौरपद देण्याची मागणी केलीय. मात्र अकोल्यातील सत्तेचं गणित नेमकं काय आहे...पाहूयात...
अकोला महापालिकेत 80 जागा आहेत.. त्यापैकी भाजप 38, काँग्रेस 21, ठाकरेसेना 06, शिंदेसेना 1, अजित पवारांची राष्ट्रवादी 1, शरद पवारांची राष्ट्रवादी 03 , वंचितचे 5 तर एमआयएमचे 03 आणि 2 अपक्ष नगरसेवक निवडून आलेत... मात्र बहुमतासाठी 41 नगरसेवकांचं संख्याबळ अपेक्षित आहे...
मात्र अपक्षांसह आंबेडकरांच्या नेतृत्वातील आघाडीच्या नगरसेवकांची बेरीज 41 इतकी होते.. तर भाजप आणि शिंदेसेनेचे 39 नगरसेवक आहेत..त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे...
अकोला महापालिकेत ओबीसी महिलेसाठी आरक्षण आहे... त्यामुळे या महापौरपदावर अपक्षांसह सर्वच पक्षांचा डोळा आहे.. त्यामुळे आंबेडकर विरोधी पक्षांची समजूत काढून भाजपला रोखण्यात यश मिळवणार की भाजप आकड्यांच्या खेळात बाजी मारणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय... मात्र भाजपला रोखण्यात आंबेडकरांना यश मिळाल्यास आगामी काळात आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यभर भाजपविरोधक एकत्र येण्याचीच शक्यता आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.