fraud SaamTVNews
महाराष्ट्र

सराफा व्यावसायिकाने हुंडा चिठ्ठीतून केली नागरिकांची साडे चार कोटींची फसवणूक

अकोल्यातील एका सराफा व्यावसायिकाने तब्बल 4 कोटी 57 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आज सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील एका सराफा व्यावसायिकाने फसवणूक केल्याची तक्रार आज सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी 4 कोटी 57 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये मुंडगावकर ज्वेलर्सच्या मालकांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस (police) ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

हे देखील पहा :

हुंडा चिठ्ठीच्या नावावर व विश्वास ठेऊन आमच्या घामाचे पैसे आम्ही मुंडगावकर ज्वेलर्स (Jewellers) यांच्याकडे दिले होते. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असून त्यांचे दुकानही बंद आहे. त्यामुळे आमची फसवणूक (Fraud) केली आहे, अशी तक्रार वजा अर्ज तक्रारकर्त्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिला आहे. यामध्ये सुरवातीला 12 तक्रारकर्ते यांचा समावेश आहे. याबाबत त्यांनी अर्ज सादर केला असून पोलिसांनी हा अर्ज स्विकारला आहे. या अर्जाच्या माध्यमातून पोलिस चौकशी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील तपास करणार आहेत. दरम्यान, या अर्जामध्ये आणखी अर्जदारांची नावे वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अवैध सावकारी आणि फसवणुकीनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तक्रारकर्त्यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जामध्ये सहा जणांवर आरोप केला आहे. यामध्ये विजय ओंकार पिंजरकर (मुंडगावकर), अमोल विजय पिंजरकर, सविता अमोल पिंजरकर, उदय विजय पिंजरकर, किरण उदय पिंजरकर, मुनिमजी राजू ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात मुंडगावकर ज्वेलर्सविरोधात देवा जोशी, कृष्णा मेहरे, अन्नपुर्णा मेहरे, उज्ज्वला मेहरे, सुचिता आगरकर, सुरेंद्र मेहरे, सुचिता मेहरे, मनोहर सापधारे, कुसुप सापधारे, रूपाली नायसे, सारिका चोपडे, किशोर सापधारे यांच्यासह आदींचा समावेश आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT