Akola Hit And Run Case: Saamtv
महाराष्ट्र

Akola Accident News: हिट अँड रनने अकोला हादरलं! अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; माय-लेकीचा करुण अंत; बाप-लेक जखमी

Akola Hit And Run Case: अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला.

Gangappa Pujari

अक्षय गवळी| अकोला, ता. २ ऑगस्ट २०२४

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनचे सत्र सुरू आहे. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये घडलेल्या मोठ्या हिट अँड रनच्या घटनांनी खळबळ उडाली असतानाच अकोल्यामधून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. अकोल्यामध्ये एका भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने माय- लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बाप- लेक जखमी झाले आहेत.

अकोल्यातून एक हिट अँड रनची मोठी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला असून बाप- लेक गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील हातरुण येथील उस्मान खान रहमान खान (वय, ३८) हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह दुचाकीने (क्र. एमएच ३० एएम ७५३९) अकोल्यातून वाडेगाव येथे जात होते. व्याळानजीक आले असता त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, उस्मान खान यांची पत्नी कशफ (वय, २८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी अनाया फातेमा (९ महिने) हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात उस्मान खान व त्यांचा मुलगा सदीम खान (वय, ५ वर्ष) हे दोघे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर अकोल्यामधील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, धडकेनंतर अज्ञात वाहनचालक गाडी घेऊन घटनास्थळावरुन फरार झाला. याप्रकरणी अकोला जिल्ह्यातीलच बाळापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT