A distressed woman carries her stroke-affected husband on her back inside Akola District Hospital due to the unavailability of a stretcher, exposing severe lapses in the healthcare system. saam tv
महाराष्ट्र

मुर्दाड आरोग्य यंत्रणेला कधी जाग येणार? स्ट्रेचर नसल्याने पतीला पाठीवर नेण्याची वेळ

Akola Hospital Negligence Wife Carries Husband No Stretcher: राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. जिल्हा रुग्णालयात असुविधांमुळे एका महिलेला आपल्या पतीला उपचारासाठी चक्क पाठीवर वाहून नेण्याची वेळ आली आहे. कुठे घडला आहे हा प्रकार? आरोग्य यंत्रणेची पोलखोल करणारा हा खास रिपोर्ट पाहूया...

Girish Nikam

राज्याची आरोग्य व्यवस्था किती तकलादू आहे याचा बोलका पुरावा अकोल्यातील एका घटनेने समोर आलाय.जिल्हा रुग्णालयातील असंवेदनशीलतेचा भेसूर चेहरा चीड आणणारा आहे. शासकीय रुग्णालयात एका आदिवासी महिलेला आपल्या रुग्ण पतीला चक्क पाठीवर घेत धावपळ करावी लागली आहे. रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने 'ब्रेन स्ट्रोक' म्हणजेच मेंदुचा पक्षघात झालेल्या पतीच्या उपचारासाठी ही महिला जीवाच्या आकांताने धावपळ करत होती. या धक्कादायक प्रसंगावरुन प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेवर राज्यभरातून टीका होतीये.

या महिलेचा पतीच्या उपचारासाठीचा संघर्ष हृदय हेलावून टाकणारा आहे. पोटाला बांधलेली बॅग आणि पाठीवर पती अशा अवस्थेत उपचार कक्षाचा शोध घेणारा हा व्हिडिओ उदासीन आरोग्य व्यवस्थेवर अनेक सवाल उपस्थित करतोय. मात्र, संतापाची बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय सोनवणे यांनी हा व्हिडिओ AI असू शकतो, असा अजब दावा केलाय. या संदर्भात कॅमेरा समोर बोलण्यास त्यांनी नकार देत सखोल चौकशी करून तुम्हाला माहिती दिली जाईल, असं सांगितलं आहे. मात्र, ज्या महिलेने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला, तिचा साम टिव्हीनं शोध घेतला. या महिलेने रुग्णालयात काय घडलं ते साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.

या घटनेवरुन राजकीय पटलावरही तीव्र प्रतिक्रीया उमटल्या.काही दिवसांपूर्वीच अडीच महिन्यांच्या लेकीचा मृतदेह आजोबांना रात्रभर मांडीवर घेऊन बसावं लागलं होतं.महाराष्ट्राला लाज आणणारी ही घटना जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडली होती. त्यानंतर आता अकोल्यात एका पत्नीवर आपल्या आजारी पतीला उपचारांसाठी चक्क पाठीवर वाहून नेण्याची वेळ आलीये. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत ढीम्म प्रशासनावर सरकार कारवाई करणार का ? मुर्दाड आरोग्य यंत्रणेला आतातरी जाग येणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT