Akola Girls Hostel Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Akola News : वेशांतर करून मुलींच्या वसतीगृहात शिरला मुलगा; धक्कादायक VIDEO व्हायरल

मुलींचे वसतीगृहच सुरक्षित नसल्याचे या व्हिडिओ वरून समोर आलंय.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील (Akola) कृषी विद्यापीठ परिसरातील मुलीच्या वसतीगृहात वेशांतर करून मुलगा शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुलाचं वेशांतर करून त्याला मुलींच्या वसतीगृहात घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. दरम्यान मुलींचे वसतिगृहच सुरक्षित नसल्याचे या व्हिडिओ वरून समोर आलंय. (Akola Girls Hostel Boy enter Viral Video)

प्राप्त माहितीनुसार, ही घटना साधारण ८ दिवसांपूर्वीची आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाला वसतीगृहात नेणारं दुसरं कुणी नसून वसतीगृहातील तरुणींनीच हे कृत्य केल्याचं समोर आलंय. या सर्व प्रकाराचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मात्र, घटना उघडकीस येऊन सुद्धा विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

व्हिडिओत काय आहे?

व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओत मुलींचे कपडे परिधान करून एक मुलगा वसतीगृहात शिरतांना दिसत आहेत. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून या मुलाने तोंडाला स्कार्प देखील बांधला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलासोबत दोन मुली सुद्धा दिसत आहेत. हा मुलगा भराभर वसतीगृहाच्या पायऱ्या चढतो आणि थेट मुलींच्या रूममध्ये प्रवेश करतो.

दुसऱ्या व्हिडिओत, हा मुलगा मुलींच्या पलंगावर बसून त्यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत. तिसऱ्या व्हिडिओत मुलगा परत वसतीगृहात जाताना दिसत आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुलींच्या वसतीगृहात भरदिवसा एखादा मुलगा वेशांतर करून जातो, आणि वसतीगृह प्रशासनाला याची खबर लागत नाही हे धोकादायक असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.संबधित प्रकार हा गंभीर असून याकडे लक्ष देण्याची मागणी या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural BP Control : उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी जीवनशैलीत काय बदल करावेत?

Maharashtra Live News Update: खारघरमध्ये माजी नगरसेविकांचं ठिय्या आंदोलन

Wheat Chocolate Cake: मैदा नाही तर गव्हाच्या पीठापासून मुलांसाठी बनवा हेल्दी चॉकलेट केक, वाचा सोपी रेसिपी

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT