अक्षय गवळी, साम टीव्ही
कापसाच्या सघन लागवड पद्धतीचं आता 'अकोला' हे देशाचा केंद्र होऊ पाहतंय. कापूस लागवडीतल्या अकोला पॅटर्नवर अलीकडेच कोईम्बतूर येथे झालेल्या भारतीय कापूस परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांनी कापूस लागवडीतील या 'अकोला पॅटर्न'चा उल्लेख केला.. 2030 पर्यंत भारतात 25 लाख हेक्टर क्षेत्रावर या पद्धतीने कापूस लागवडीचा सरकारचा मानस असणारेय. या अंतर्गत अकोला जिल्ह्यात पुढच्या वर्षभरात पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर या पद्धतीने लागवडीचं ध्येय आहे.
सघन कापूस लागवड म्हणजे प्रचलित पद्धतीपेक्षा एकरभरात जास्ती झाडांची लागवड आणि उत्पादन असं या प्रयोगाचं स्वरूप आहे. सघन कापूस लागवड हा प्रयोग नेमका काय आहे? आणि अकोला या प्रयोगाचं देशाचं केंद्र कसं बनत आहे?, पाहूया..
जगात कापसाखाली सर्वाधिक क्षेत्र भारतात असले तरी उत्पादकतेच्या बाबतीत मात्र भारत पिछाडीवर आहे. उत्पादकता वाढीसाठी भर देण्याची आवश्यकता बनलीय. आज राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादक वाढीसाठी अकोल्यातील हे शेतकरी दिलीप ठाकरे प्रयत्न आणि मार्गदर्शन करतायत.. या शेतकऱ्याचा कापूस लागवड प्रयोग देशभरात गाजणार आहे.. त्यांच्या 'सघन' पद्धतीने कापूस लागवडीतून एकेरी 15 ते 18 क्विंटल कापूस मिळतो आहे.
दिलीप ठाकरे या शेतकऱ्याचा कापूस लागवड प्रयोग आता देशभरात गाजणारेय. ठाकरेंच्या कापूस लागवड प्रयोगाची चर्चा दिल्लीपर्यंत आहे. त्यांची केंद्र सरकारच्या एमसीएक्स कापूस बाजार समिती आणि कस्तूरी कॉटन समितीत नियुक्ती झाली. याचाच देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. तब्बल 9 राज्यात त्यांच्या मार्गदर्शनातं सघन'द्वारे कापसाचं विक्रमी उत्पादन होत आहे.
दरम्यान, आता कापूस लागवडीतल्या 'अकोला पॅटर्न'वर अलीकडेच कोईम्बतूर येथे झालेल्या भारतीय कापूस परिषदेत मोठी घोषणा झालीय. केंद्रीय कृषिमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांनी कापूस लागवडीतील या 'अकोला पॅटर्न'चा उल्लेख केला. 2030 पर्यंत भारतात 25 लाख हेक्टर क्षेत्रावर या पद्धतीने कापूस लागवडीचा सरकारचा मानस असल्याचे कृषिमंत्र्यांनी म्हटलेय.
ठाकरेंची नेमकी काय आहे 'सघन' पद्धत, आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?
सघन पद्धतीत लागवड करावयाची असल्यास योग्य वाणाची निवड करणं.
ज्यात लवकर येणारं बुटके वाण, उभाट वाढणारे, मोठ्या फ़ांद्या नसणारे आणि बोंडातील अंतर कमी असणार वाण.
सघन पद्धतीनुसार शेतातील वाणमधील 2 रांगामधील अंतर 80 सेंटीमीटर आणि बाय 20 सेंटीमीटरपर्यत.
एकरीनुसार 20 सेमी बाय 20 सेमी अंतराप्रमाणं 29 ते 40 हजार झाड लागवड.
एकरी 13 क्विंटलहून अधिक उत्पादन. 2017 मध्ये त्यांना एकरी 18 क्विंटल इतकं उत्पन्न.
सघनमध्ये बियाणे खर्चात वाढ, मात्र इतर खर्च तोच.
पारंपारिक पद्धतीत उत्पादन कमी
भारतात पारंपरिक लागवडी पद्धतीमध्ये केवळ एकरी 6 ते 7 हजार झाडे.
सरासरी एकरी 4 ते 5 क्विंटल इतके उत्पादन केवळ हाती.
त्यात पावसावर आधारित कोरडवाहू क्षेत्रामध्ये सिंचनाचा अभाव असल्यानं उत्पादनही अनिश्चित राहणं.
यामध्ये आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पुढं सरसावलाये. कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी विद्यापीठ भर देणारेय. पुढील हंगामात अकोला जिल्ह्यात 50 हजार हेक्टरपर्यंत 'सघन' पद्धतीने कापूस लागवडीसाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी म्हटलंय. निश्चितच या संकल्पनेतून देशात कापूस उत्पादकता वाढल्यास शेतकरी वर्ग सुखावला जाईल, हे निश्चितच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.