Akola : अकोल्यात शांततेत पार पडले दुर्गा विसर्जन! जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola : अकोल्यात शांततेत पार पडले दुर्गा विसर्जन!

मुसळधार पावसात अकोट तालुक्यात दुर्गा मूर्ती विसर्जन हे शांततेत पार पडले.

जयेश गावंडे

अकोला : मुसळधार पावसात अकोट तालुक्यात दुर्गा उत्सव विसर्जन हे शांततेत पार पडले. अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले पोपटखेड धरण व अकोट तालुक्यातील सर्व दुर्गा देवी विसर्जनाकरीता पोपटखेड येथील धरणावर कोरोनाचे नियम पाळून शांततेत पार पडले. यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांनी धरणाच्या जवळ स्वतः पहारा ठेवून चोख बंदोबस्त ठेवला होता.

हे देखील पहा :

अकोट तालुक्यातील दुर्गादेवी उत्सव मंडळाचे पाण्याशी कोणताही संबंध येऊ नये आणि कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता डॅम वर बॅरीकेट लावून त्या ठिकाणी आरती पूजा करून दुर्गा देव्या ह्या विर एकलव्य बचाव पथकाच्या स्वाधीन केला. यावेळी विर एकलव्य बचाव पथक पोपटखेड यांनी स्वयंपुर्ती ने पाण्यामध्ये उतरुन कोणत्याही दुर्गादेवी मंडळाला पाण्यामध्ये उतरू न देता स्वयंस्फूर्तीने मूर्ती विसर्जित केले आहे. या ठिकाणी निर्माल्य जमा करून त्याची विल्हेवाट लावून नदी-तलावाला प्रदूषणापासून रोखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व्यवस्थित संकलित करून जमा केले.

पोपटखेड मार्गावर खड्डेच खड्डे..!

अकोट शहरातील दुर्गा देवी विसर्जन पोपटखेड येथील धरणांमध्ये करण्यात आले. यावेळी अकोट शहरासह ग्रामीणभाग तसेच पोपटखेड मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे दुर्गा देवी नेणारे वाहने यांना कसरत करून पोपटखेड येथे दुर्गा देवी विसर्जना करिता नेतांना नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे भक्तांनमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT