Politics : निवडणुकीसाठी मनसेचा 'डिजिटल राजमार्ग'

काय आहे मनसेचा डिजिटल राजमार्ग? वाचा सविस्तर
Politics : निवडणुकीसाठी मनसेचा 'डिजिटल राजमार्ग'
Politics : निवडणुकीसाठी मनसेचा 'डिजिटल राजमार्ग' SaamTvNews
Published On

--सुशांत सावंत

मुंबई : गेल्या काही वर्षात राजकीय पक्ष डिजिटल माध्यमाचा पुरेपूर वापर करताना पहायला मिळता असून, निवडणुकीच्या काळात तर, या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर तर सर्वाधिक होत असतो. आता तर मनसेने त्यांच्या पक्षाचे अधिकृत पेजही अपडेट केले आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेसोबतच इतर पालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत.

आधीच हिंदुत्वाची कास पकडलेल्या मनसेने निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली असतानाच, आता मनसे डिजिटल राजमार्ग याचा सोशल मीडियावर पुरेपूर वापर करणार असल्याचे सध्या तरी मनसेने आपल्या अधिकृत पेजवर टाकलेल्या पोस्टवरून दिसून येत आहे.

काय आहे मनसेचा डिजिटल राजमार्ग? वाचा फेसबुक पोस्ट

प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नवनिर्माणाच्या विचारांना follow करत, राज्यभरातील महाराष्ट्र सैनिकांच्या कार्याला like करत, महाराष्ट्र धर्म share करत, अन्यायाविरोधात comment करत मनसेचे वादळ उठवू या! निवडणुकीतील विजयाकडे नेणारा डिजिटल राजमार्ग बांधूया! असे म्हणत मनसेने एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत प्रसार माध्यम MNS Adhikrut हे आता कात टाकत असल्याचे म्हटले आहे. तसेच फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांच्यासह विविध समाज माध्यमांवर उपस्थित लक्षावधी महाराष्ट्र सैनिकांना आणि जगभरातील मराठीजनांना जोडून घेत नव्या रंगात, नव्या ढंगात येत आहे. आपल्याला राज ठाकरे यांनी मांडलेला नवनिर्माणाचा विचार अधिक प्रभावीपणे सर्वदूर पोहोचवायचा आहे. त्यासाठी तुमचाही सहभाग हवाच.

असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मनसे अधिकृतवर काय पहायला मिळणार ?

राज ठाकरे यांच्या रोखठोक भूमिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या व्हिडिओ मुलाखती.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा परिचय.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासकांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आणि ताज्या घडामोडीवरील विशेष लेख.

Politics : निवडणुकीसाठी मनसेचा 'डिजिटल राजमार्ग'
राज्यातील महिला अत्याचार मोडीत काढायला योग्य पावलं उचलत आहोत - गृहमंत्री

त्यामुळे मनसेचा हा 'डिजिटल राजमार्ग' पक्षाच्या भूमिका, ध्येय धोरणे आणि राजकीय समीकरणे मतदारांपर्यंत पोहचवून त्यांना आकृष्ट करण्यात कितपत यशस्वी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com