Diwali Special : अनाथ आश्रमातील मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! जयेश गावंडे
महाराष्ट्र

Diwali Special : अनाथ आश्रमातील मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

आनंद आश्रमातील मुलींसोबत अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी सहपरिवार दिवाळी साजरी केली.

जयेश गावंडे

अकोला : दिवाळी हा आनंद आणि उत्साहाचा सण, सर्व कुटुंब या सणाला एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करतात. मात्र, ज्यांना कुणीच नाही अशा आनंदाश्रमातील मुलींसोबत अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी सहपरिवार दिवाळी साजरी करून त्या मुलीसोबत गाणे गाऊन आणि आनंदाश्रमात प्रकाशाची पणती लावली. या मुलींना एक भाऊ म्हणून आम्ही सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली.

हे देखील पहा :

ही दिवाळी आपले भावनिक नाते घट्ट करणारी असणार असा कायमचा विश्वास दिला. दरम्यान, उपजिल्हाधिकारी खडसे यांनी या मुलींना मिठाई वाटून फटाक्यांची अतिषबाजी केली. या अनाथ मुलींसोबत सहपरिवार खडसे कुटुंबांने दिवाळी साजरी केल्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंदाश्रु पहायला मिळाले. या यावेळी संजय तिडके, अजय शेगर, भूषण ताजनेसर, कैलास गणेशपुरे, रोहन बुंदेले आणि प्रा. खडसे यांच्या आई कमलाबाई खडसे, पत्नी नीता खडसे, मुलगा संनीत, मुलगी सना यांच्यासह आनंद आश्रमातील दीदी उपस्थित होत्या.

दिवाळीच्या पर्वावर मुलींनी छान गाणे गायले. तर खडसेंनी गीत गाऊन मुलींचा आत्मविश्वास वाढविला. मिठाई चे वाटप केल्यांनतर दिवे लावून लखलखाट करण्यात आला. एक परिवारात दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला. निराधारांना दिवाळी च्या दिवशी आधार देण्याचे कार्य खडसे यांनी केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT