ड्रेस बदलून दुचाकी चोरणारा अट्टल चोर पोलिसांच्या ताब्यात; १७ गाड्या जप्त!
ड्रेस बदलून दुचाकी चोरणारा अट्टल चोर पोलिसांच्या ताब्यात; १७ गाड्या जप्त!मंगेश मोहिते

ड्रेस बदलून दुचाकी चोरणारा अट्टल चोर पोलिसांच्या ताब्यात; १७ गाड्या जप्त!

या चोराची चोरी करण्याची पद्धत इतर चोरांच्या तुलनेत निराळी आहे. तो जेव्हा बाईक चोरी करायला निघतो तेव्हा कपडे बदलतो. एक चोरी झाली की ड्रेस बदलून तो दुसऱ्या चोरी वर निघतो.
Published on

-- मंगेश मोहिते

नागपूर : बाईक चोरी करण्यात पटाईत असलेला आरोपी मानकापूर पोलिसांच्या हाती लागला त्याची चौकशी करतातच एकदोन नाही तर चक्क 17 बाईक त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या. त्याची चोरी करण्याची पद्धत मात्र इतर चोरांच्या तुलनेत निराळी आहे. तो जेव्हा बाईक चोरी करायला निघतो तेव्हा कपडे बदलतो. एक चोरी झाली की ड्रेस बदलून तो दुसऱ्या चोरी वर निघतो.

हे देखील पहा :

बाईक चोरी केली तो गॅरेज वाल्या कडे जातो हा गॅरेजवाला त्याचा पार्टनर आहे. हे दोघे लगेच या गाड्यांचे पार्ट काढतात आणि दुसऱ्या गाड्यांना लावून त्याची विक्री करतात. त्यांच्याकडून आता पर्यंत 17 चोरी च्या घटनांचा उलघडा झाला असला तरी आणखी काही गुन्हे पुढे येण्याची शक्यता आहे.

ड्रेस बदलून दुचाकी चोरणारा अट्टल चोर पोलिसांच्या ताब्यात; १७ गाड्या जप्त!
बायकोच्या प्रियकराला कापून मृतदेह भट्टीत जाळला! 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे खून
ड्रेस बदलून दुचाकी चोरणारा अट्टल चोर पोलिसांच्या ताब्यात; १७ गाड्या जप्त!
२० वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार! लोणी पोलिसात गुन्हा दाखल
ड्रेस बदलून दुचाकी चोरणारा अट्टल चोर पोलिसांच्या ताब्यात; १७ गाड्या जप्त!
नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार!

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होत होती. त्यावरून पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रित केलं आणि या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र त्याची चोरी करण्याची पद्धत पाहून पोलिसही आवाक झाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com