मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत पक्षप्रवेश नाकारला
संतप्त दाम्पत्याचा अजित पवार गटात प्रवेश
दाम्पत्य अकोट तालुक्यातील बेलुरा गावचे आहेत
अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोला जिल्ह्यातील हिवरखेडे येथे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत भाजपात प्रवेश न होऊ शकलेल्या सरपंच दीपिका मंगळे आणि राम मंगळे यांनी आकोट येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. दीपिका मंगळे या अकोट तालुक्यातील बेलुरा गावच्या सरपंच आहेत. तर त्यांचे पती हे बेलुरा गावचे माजी सरपंच आहेय. गेल्या 20 वर्षांपासून बेलुरा गावावरून मंगळे यांची सत्ता आहेय.
काल हिवरखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत त्यांचा भाजपा प्रवेश होणार होताय. मात्र, आपल्या पाचशे समर्थकांसह तिथे जाऊनही आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपला भाजपात प्रवेश न होऊ दिल्याचा गंभीर आरोप राम मंगळे आणि दीपिका मंगळे यांनी केला होताय.
दरम्यान, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यावर टीका करत मंगळे दाम्पत्याने भाजपच्या रामराज्यात रावणराज्य सुरू असल्याचे टीका केली होतीय. भाजपात प्रवेश न मिळाल्याने संतप्त झालेल्या मंगळे दापत्यांनी आज अकोट येथील अजित पवारांच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झालाय.
तत्पूर्वी, अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना आज अजित पवारांनी संबोधित केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले की अकोटमध्ये बहुजन, सर्व जाती–धर्माचे लोक एकत्र राहतात. अकोट नगरपालिका क्षेत्रातल्या रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज, साफसफाई, आठवडे बाजार, मैदानं, पार्क आदी सर्वांच्या बाबतीत सुधारणा घडवून आणणं, ही काळाची गरज आहे.
'अकोट शहरात बकालपणा नसावा, अंधार नसावा, अस्वच्छता नसावी. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांनी शिकवलंय की, ‘स्वच्छता म्हणजेच सेवा!’ त्याच विचारांवर चालायचं, असं पवार म्हटले.
दरम्यान, गाजिया बानो बदरुज्जमा (अकोट), आंचल ओंकारे (हिवरखेड), कृष्णराव गावंडे (मूर्तिजापूर) आणि राजकन्या पवार (तेल्हारा) हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारार्थ आज अजित पवारांची प्रचार सभा पार पडली. यावेळी अनेकांनी राष्ट्रवादी जाहीर प्रवेश झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.