Crime News
Crime News saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News : बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, नराधम बापाचा मुलीवर अत्याचार

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime Latest News :  वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना अकोल्यात उघड झाली आहे. अकोल्यातील तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याची बाब पीडितेने आईजवळ कथन केली.

आईने पीडित मुलीसह पोलीस (Police) स्टेशनमध्ये धाव घेत पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. यावरून तेल्हारा पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिता-पुत्रीच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार तालुक्यात घडला आहे. स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पीडितेने आईसह पोलिसांत धाव घेतली.

आई कामाला गेल्यावर आरोपी बापाने घृणास्पद कृत्य केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी गुन्हे नोंदवून आरोपीस अटक केली आहे. सपोनि ज्ञानोबा फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला असून नराधम आरोपी बापाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या नराधम बापाला कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT