Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात कोणते शब्द जास्त वेळा वापरले? वाचा इंटरेस्टिंग माहिती

अर्थमंत्र्यांनी कोणत्या भाषणात कोणते शब्द सर्वाधिक वेळा वापरले यावर एक नजर टाकूया.
Nirmala Sitaraman
Nirmala SitaramanSaam Tv
Published On

Union Budget 2023:  अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थमंत्री म्हणून आपला पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकार किती पैसे खर्च करणार हे या अर्थसंकल्पात सांगितलं जाईल. अर्थसंकल्पाबाबत सर्वांनाच नेहमी आकर्षण असतं. बजेटबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी देखील आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणते शब्द वापरले आहेत हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते.(Nirmala Sitharaman presents Union Budget)

मागील 4 अर्थसंकल्प पाहिले तर एक इंटरेस्टिंग डेटा समोर आला आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता की गेल्या 4 वर्षांच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणते शब्द किती प्रमाणात वापरले आहेत. अर्थमंत्र्यांनी कोणत्या भाषणात कोणते शब्द सर्वाधिक वेळा वापरले यावर एक नजर टाकूया. (Latest Marathi News)

Nirmala Sitaraman
Budget Session 2023 : अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय अपेक्षा आहेत? पूर्ण झाल्या तर भारीच!

अर्थसंकल्प 2019

  • इन्वेस्टमेंट- 35 वेळा

  • इलेक्ट्रॉनिक 22 वेळा

  • टेक्नोलॉजी- 18 वेळा

अर्थसंकल्प 2020

  • डेव्हलपमेंट- 48 वेळा

  • इन्फ्रास्ट्रक्चर - 33 वेळा

  • एज्युकेशन- 25 वेळा

  • हाऊसिंग- 24 वेळा

अर्थसंकल्प 2021

  • इन्फ्रास्ट्रक्चर - 57 वेळा

  • हेल्थ- 31 वेळा

  • डेव्हलपमेंट- 28 वेळा

अर्थसंकल्प 2022

  • डिजिटल - 35 वेळा

  • डेव्हलपमेंट- 33 वेळा

  • इन्फ्रास्ट्रक्चर - 27 वेळा

Nirmala Sitaraman
Budget 2023: अर्थसंकल्प कुठे पाहता येईल? अर्थसंकल्पाच्या भाषणाची संपूर्ण कॉपी मोबाईलवरही मिळेल

निर्मला सीतारमन यांच्या भाषणाचा कालावधी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 साली 1.30 मिनिटांचं भाषण केलं होतं. तर 2021 मध्ये 1.40 मिनिट, 2020 मध्ये 2.41 मिनिट आणि 2019 साली 2.17 मिनिटांचं भाषण केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com