Akola Crime x
महाराष्ट्र

Akola : चौथीच्या मुलीचा तिच्याच वर्गमित्राच्या वडिलांकडून विनयभंग, वर्गशिक्षिकेकडे तक्रार केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर

Akola Crime : अकोला शहरातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर तिच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या वडिलांनी विनयभंग केला. मुलीने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Yash Shirke

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

अकोला : अकोला शहरातल्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका जिल्हा परिषद प्राथमिक शालेयमधील वर्ग चौथ्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनीचा तिच्याच वर्ग मित्राच्या वडिलाने विनयभंग केलाय. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी बाल संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला गजाआड केलंये. वर्ग मित्राचे वडीलाने वाईट पद्धतीने स्पर्श केल्या असल्याची तक्रार वर्ग शिक्षिकाकडे विद्यार्थिनीने केली होती, त्यानंतर या संपूर्ण घटनेला वाचा फुटली.

नेमकं काय घडलं होतं?

अकोल्यातल्या जुने शहर पोलीस स्टेशनपासून 4 किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शालेयमधील एका विद्यार्थीनीसोबत घडलेल्या प्रकारानंतर जिल्ह्यात संतापाची लाट आहे. पीडित अल्पवयीन मुलीचे नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी कामाला गेलो असता पावणे दहा वाजताच्या सुमारास मुलीच्या वर्ग शिक्षिकेचा फोन आला, आणि मुलीची तब्येत बरी नाहीए, आपण लवकर शाळेत यावं, असा निरोप मिळाला. त्यानंतर पीडित मुलीचे नातेवाईक शालेयमध्ये हजर झाले. त्यानंतर महिला शिक्षिकेने घडलेला संपूर्ण प्रकार मुलीच्या नातेवाईकांना सांगितला. लागलीच नातेवाईकांनी जुने शहर पोलीस स्टेशन गाठल, मुलीला वाईट पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 74,75 bns, r/w 8,9 m,10 पाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वर्ग मित्राच्याच वडिलानेच केला बॅट टच...

तक्रारीत म्हटलं आहे की पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी सकाळी घरून निघाली. शाळेत जात असताना वर्ग मित्र आणि मैत्रिणींना सोबत नेण्यासाठी त्यांच्या घराजवळ पोचली. तितक्यात सत्यपाल सावध याचा मुलाला अर्थातच वर्गमित्राला बोलावण्यासाठी त्याचे घरी गेली होती. त्याची शालेय तयारी बाकी होती, आरोपी पीडितेला म्हणाला की, त्याचा शालेय युनिफॉर्मचा टाय लावून दे. 'ती' आरोपीच्या मुलाला टाय लावून देण्यासाठी घरात गेली, असता सत्यपालने मुलीच्या तोंडावर हात फिरवत अंगाला वाईट उद्देशाने स्पर्श केला. तेव्हा, ती रडायला लागली, त्यानंतर आरोपीने पन्नास रुपये देईन, तुझ्या आईला सांगू नको, शाळेला सुट्टी झाल्यावर परत घरी ये, असे म्हटले. पुढं मुलीने आरोपीला धक्का देत पळाली.

'ती' पायऱ्यावर बसून रडत असतानाच...

या संपूर्ण प्रकारानंतर विद्यार्थिनी शाळेत दाखल झाली. शाळेच्या बाथरूम जवळील पायऱ्याजवळ 'ती' बसून होती. तितक्यात वर्गशिक्षिका तिच्याजवळ आल्या.. आणि तिला विश्वासात घेत सर्व बाबींची चौकशी केली. घडलेला सर्व प्रकार शिक्षिकाला सांगितला. त्यानंतर शिक्षकाने या सर्व प्रकरणाची माहिती महिला हेल्पलाइन क्रमांकावर दिली. आणि तिच्या कुटुंबीयांना देखील शाळेत बोलावून घेतलं होतं. अशाप्रकारे या संपूर्ण घटनेला वाचा फुटली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT