Akola Crime News x
महाराष्ट्र

Akola Crime : अकोल्यात क्रूरतेचा कळस, २७ वर्षीय तरुणाचा अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार

Akola Crime News : अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यात किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. एका २७ वर्षांच्या तरुणाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातून एक खळबळजनक आणि क्रूरतेचा कळस गाठणारी समोर आली आहे. एका 27 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलावर अर्थातच बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्वस्थरातून या घटनेचा रोष व्यक्त केला जातो आहे. आरोपीच्या विरोधात उरळ पोलीस स्टेशन या ठिकाणी बाल संरक्षण कायदे अंतर्गत अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय होतं प्रकरण?

अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील निंबी गावात काल 17 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आरोपीच्या निवासस्थान परिसरात पीडित अल्पवयीन मुलाचे नातेवाईक बांधकामाच्या कामानिमित्त गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील होता. थोड्यावेळाने लांब असलेल्या वाडग्यात दोन लहान भावंड खेळायला गेले. येथे वाडग्यात पीडित बालक व त्याचा भाऊ असे दोघेजण खेळणी खेळत होते. आरोपीने पीडित बालकाच्या भावाला पिण्याचे पाणी आणण्यासाठी घरी पाठवले. त्यानंतर यातील पीडित बालक हा एकटा होता, याचीच संधी साधून त्याने त्याच्यावर अनैसर्गिकपणे लैंगिक अत्याचार केले.

आरोपीवर विविध कलमानव्ये गुन्हे दाखल...

या संपूर्ण घटनेनंतर पीडित मुलाने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लागलीच कुटुंबियांनी उरळ पोलीस स्टेशन गाठलं. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने आरोपीच्या याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. दाखल गुन्ह्यात कलम 3,4,5,6,9 आणि बाल संरक्षण कायदा अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपीला आज पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Travel : महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे तुम्हाला माहिती आहेत का? एकदा नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

तरूणीच्या गळ्यावरून चाकू फिरवला; घरात रक्ताचा सडा, बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं, कारण काय?

New Rule: LPG ते पेन्शन; १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर'च्या कमाईत घसरण, रितेश देशमुखच्या 'मस्ती 4'नं किती कमावले?

SCROLL FOR NEXT