Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: गावात होत असलेला पाणी पुरवठा सतरा दिवसांआड होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत असून पाणी प्रश्न सुटत नसल्याने ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्याने आंदोलन छेडले आहे. अकोट शहरातल्या एका पाण्याच्या टाकिवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यास सुरवात केली.  

अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्याने आंदोलन केले. गावात १७ दिवसांआड़ पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. अनेकदा सबंधित विभागाला सांगून देखील कुठलीही दखल घेतली गेली नाही. अनेकदा ग्रामपंचायतच्या वतीने समस्या मांडल्या गेल्या. त्यानंतरही पाणी पुरवठाचा (Water Supply) प्रश्न सुटला नाही. अखेर मुंडगाव गावातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पाण्याच्या टाकीवर चढ़त शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. 

जोपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी आमचा प्रश्न निकाली काढ़ण्याचे आश्वासत देत नाही; तोपर्यत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मुंडगाव ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्य तुषार पाचकोर म्हटले. या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. (Akot) दरम्यान गावात दोन पाण्याच्या टाकी आहेत. या गावात पाण्याची टाकी अद्यापही पूर्णपणे भरल्या गेल्या नाही. त्यामुळे नाईलाजानं गावकऱ्यांना १७ दिवसांआड़ पाणी पुरवठा होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सांगितलं असता त्यांनी उत्तर द्यायला टाळाटाळ केली. प्रेशर अभावी पाण्याची टाकी अपूर्ण राहत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आल्याचे तुषार पाचकोर म्हटले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT