Akot Police Saam tv
महाराष्ट्र

Akot Police : दुर्गादेवी विसर्जनाच्या डीजेचा दणदणाट; ३२ डीजे मालकांवर गुन्हे दाखल

Akola News : नवरात्र उत्सव मंडळांकडून विसर्जन मिवरणुकीत बंदी असताना देखील डीजे लावण्यात आले होते. यामुळे अकोटमध्ये अनेक ठिकाणी डीजेचा आवाज ऐकण्यास मिळाला. या विरोधात पोलिसांनी कारवाई केली

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : गणेशोत्सवानंतर दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. नऊ दिवसांचा उत्सव साजरा झाल्यानंतर दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात येत आहे. अशात विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरावर बंदी असताना देखील यात डीजेच्या दणदणाटाचा आवाज घुमला. या विरोधात पोलिसांनी कारवाई करत दणका दिला आहे. यात ३२ डीजे मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट येथे सदरची कारवाई करण्यात आली आहे. गणेश मिरवणूक व दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर केला जात असतो. मात्र यामुळे होणार त्रास लक्षात घेता मिरवणुकीत डीजे वापरावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान नवरात्र उत्सव मंडळांकडून विसर्जन मिवरणुकीत बंदी असताना देखील डीजे लावण्यात आले होते. यामुळे अकोटमध्ये अनेक ठिकाणी डीजेचा आवाज ऐकण्यास मिळाला. 

आदेशाचे उल्लंघन 

अकोल्यात देवी विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजेच्या दणदणाटाचा आवाज गाजला. अर्थात प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करत डीजे वाजविण्यात आला होता. या डीजेवर पोलिसांची कडक कारवाई केल्याचे पाहण्यास मिळाली. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात तब्बल ३२ डीजे मालकांवर गुन्हे दाखल करत ही कारवाई करण्यात आली करत चांगलाच दणका दिला आहे.

दंडात्मक कारवाई करत डीजे जप्त 

दरम्यान अकोट शहरात देवी विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज वाढला. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अकोट पोलिसांनी डीजेवर मोठी कारवाई केली. ३२ डीजेच्या गाड्या पोलीस ठाण्यात लावण्यात आले. त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात नवरात्र उत्सव मंडळांना हा एक मोठा इशारा आहे. डीजे वाजवाल तर कारवाईला समोर जाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT