AKASH GAWAI KILLED saam tv
महाराष्ट्र

एकाच टोळीत वावरले, नंतर बनले दुश्मन; आकाश गवईचा रक्तरंजित शेवट

Akola Akash Gawai Case: अकोल्यातील गौरक्षण रोडवर आकाश गवईची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. जुन्या वैरातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे.

Omkar Sonawane

अक्षय गवळी, साम टीव्ही

कधीकाळी एकमेकांचे जिवलग मित्र... एकाच टोळीत वावरणारे... मात्र गुन्हेगारी जगतातील वर्चस्वाच्या संघर्षातून हेच मित्र एकमेकांचे कट्टर वैरी बनले... आणि याच वैराचा शेवट झाला रक्तरंजित हत्याकांडात! अकोल्यातील गौरक्षण रोडवर रात्री आकाश गवईची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आलीय... हाताची बोटं तुटून पडतील इतका क्रूर हल्ला... या हत्येनंतर आकाशच्या कुटुंबीयांचा खदान पोलीस ठाण्यात ठिय्या... नेमकं काय घडलं? मैत्रीचं रूपांतर वैरात कसं झालं? आणि या हत्येचा तपास आता कोणत्या दिशेने सुरू आहे?

अकोल्यातील गौरक्षण रोड... रात्रीच्या अंधारात अचानक घडलेला रक्तरंजित थरार... महावितरणच्या सबस्टेशनसमोर आकाश गवईच्या आयुष्याचा शेवट झालाय!... रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आकाश आपल्या मित्रांसोबत अंडाभुर्जी खाण्यासाठी आला होता... याचवेळी कारमधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले... हल्ला इतका भीषण होता की, आकाशच्या हाताची बोटंही तुटून पडली... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला...

घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले... मात्र, या हत्येमागे केवळ अचानक झालेला वाद नव्हता, तर जुन्या वैराची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येतेय.. आकाश गवई आणि हत्या प्रकरणातील आरोपी... कधीकाळी हे एकमेकांचे जिवलग मित्र होते... एकाच गुन्हेगारी वर्तुळात वावरणारे... मात्र, गुन्हेगारी जगतातील प्रभाव आणि वर्चस्वावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले... हळूहळू या मतभेदांचं रूपांतर कट्टर वैरात झालंय...आणि याच जुन्या वैरातून आकाशची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय...

या प्रकरणात सतीश वानखडे, गणेश लांडगे आणि एका अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय... मृतक आणि आरोपी हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे... अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय...आकाश गवईच्या हत्येनंतर संतप्त कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचा मोठा जमाव खदान पोलीस ठाण्यात दाखल झाला... आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय... पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच आकाशची हत्या झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केलाय...

अकोला शहरात दोन दिवसांत दोन हत्या... गुन्हेगारी वर्चस्वाच्या संघर्षातून जुन्या मैत्रीचं वैरात रूपांतर... आणि त्यातून एका तरुणाचा रक्तरंजित अंत... आकाश गवईच्या हत्येने पुन्हा एकदा अकोला शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय... आता या हत्येतील आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकतात आणि या रक्तरंजित वैराचा पूर्ण उलगडा कधी होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Health : पीरियड्स अनियमित असतील तर रोजच्या या ५ चुका टाळा; PCOS चा त्रास वाढू शकतो

Kalyan News : सासूच्या भांडणाचा जाब विचारल्याचा राग अनावर झाला; पाय फ्रॅक्चर होईपर्यंत जावयाला मारहाण

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले! उपचारांसह मुलांच्या शिक्षणाचीही घेतली जबाबदारी

Eye Care Tips : डोळ्यांची दृष्टी नकळत होतेय कमजोर? रोजच्या या ८ सवयी असू शकतात कारण, वेळीच सावध व्हा

डिलिमिटेशनला पाठिंबा दिला तरी शरद पवारांचं इंडिया आघाडीतील स्थान बदलणार नाही: राहुल गांधींचं मोठं विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT