Akola Accident News: Saamtv
महाराष्ट्र

Akola Accident: एक चूक अन् भयंकर अपघात! कार- ट्रकची समोरासमोर धडक, २ जागीच ठार; भाजप कार्यकर्त्यासह १ गंभीर जखमी

Akola Accident News: अकोल्यातील भाजप कार्यकर्त्याचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून कारने अकोल्याकडे येताना ही मोठी दुर्घटना घडली.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. २६ जुलै २०२४

अकोल्यामधील एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चुकीच्या दिशेने कार घेतल्याने समोरुन येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये कारमधील दोघे जागीच ठार झाले असून भाजप कार्यकर्त्यासह दोघे जखमी झालेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोल्यातील भाजप कार्यकर्त्याचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून कारने अकोल्याकडे येताना ही मोठी दुर्घटना घडली. काल रात्री अकर वाजता ही घटना घडली, ज्यामध््ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप आमदार रणधीर सावरकर यांचे निकटवर्तीय समजल्या जाणारे संदीप गावंडे यांच्यासह काही जण कारने नागपूरहून अकोल्याकडे येत होती. यावेळी अमरावतीजवळ त्यांनी आपली कार राँग साईडने टाकली. याच चुकीमुळे समोरुन येणाऱ्या ट्रकची आणि त्यांच्या कारची समोरा-समोर धडक झाली.

यामध्ये नकुल तडोकार आणि विजय मदनकार यांचा जागीच मृत्यू झाला. तर भाजप आमदार रणधीर सावरकर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संदीप गावंडे आणि मुकेश सरप हे जखमी झालेत. अपघातातील मृत आणि जखमी सर्व जण अकोल्यातील मोठी उमरी भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT