Manoj Jarange Patil: 'विरोधकांनी भूमिका स्पष्ट करा', मनोज जरांगेंचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच आवाहन; २९ ऑगस्टला घेणार मोठा निर्णय!

Manoj Jarange Patil Maratha Aarkshan Latest News: सरकारमुळे आमचा नाईलाज झाला असून 29 ऑगस्ट रोजी 288 लढायचे की पाडायचे हे ठरवणार आहे,' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा; नाशिकमधील सकल मराठा समाजाची मागणी
Sharad Pawar Maratha reservationSaam TV
Published On

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २६ जुलै २०२४

"आम्हाला राजकारणामध्ये पडायचे नाही, मात्र आमच्या मान्य झाल्या नाहीत, आरक्षण मिळाले नाही तर आमच्यासमोर पर्याय काय? त्यामुळे नाईलाजाने आम्ही २८८ पाडायचे की उभे करायचे याबाबत निर्णय घेणार आहोत," असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"अजून सरकारच बोलणं झालं नाही. पावसामुळं सरकार बिझी आहे. जनतेचा कामात व्यस्त आहे. आमच्यावर जर अन्याय झाल तर आम्ही पाडापाडी करणार आहे. सरकारमुळे आमचा नाईलाज झाला असून 29 ऑगस्ट रोजी 288 लढायचे की पाडायचे हे ठरवणार आहे, सर्व समाज एकत्र होणार आहे' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"गोर- गरीब मराठ्यांना मोठं करायचं असेल तर सर्व सामान्य माणसाची लढाई लढणार आहे. 29 ऑगस्ट रोजी भूमिका जाहिर करू, 14 ते 20 ऑगस्ट उमेदवारांची यादी करू. 20 ते 27 ऑगस्टला या यादीवर चर्चा करू आणि 29 ऑगस्ट रोजी काय करायचं ते ठरवू " असे म्हणत तुम्ही जर आम्हाला डिवचले तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही जरांगेंनी यावेळी दिला.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा; नाशिकमधील सकल मराठा समाजाची मागणी
Pune Heavy Rain Photos: पुणे पाण्यात! नागरिकांचे प्रचंड हाल; पाहा धडकी भरवणारे फोटो

"मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही, याबाबत उध्दव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक आपली भूमिका स्पष्ट करतं नसेल तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, वाट पाहू नये," असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवत विरोधकांनाही सवाल केला.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा; नाशिकमधील सकल मराठा समाजाची मागणी
Satara Tourist Spots Closed: पावसाळी पर्यटनाला ब्रेक! सातारा जिल्ह्यातील धबधबे अन् पर्यटनस्थळे बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com