Nandurbar Breaking: नंदुरबारमध्ये महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; आजी-माजी मंत्री एकमेकांना भिडले, नेमकं काय घडलं?

Shinde Group BJP Leader Clashes Vijaykumar Gavit: नंदुरबारमध्ये महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे.
महायुतीचा अंतर्गत वाद
Shinde Group BJP Leader ClashesSaam Tv
Published On

सागर निकवाडे, साम टीव्ही नंदुरबार

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात 'खिडकी'वरून राजकारण तापलंय. आजी-माजी आदिवासी विकास मंत्री एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. तर मंत्री विजयकुमार गावित यांनी काँग्रेस आमदारांवर जहरी टीका केलीय. राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे आणि भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये नंदुरबारमध्ये आलबेल नसल्याचं दिसत आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

महायुतीचा वाद चव्हाट्यावर

नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषदेत जलजीवन मिशनच्या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माजी आदिवासी विकास मंत्री आणि काँग्रेस आमदारांसोबतच शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी जलजीवन मिशनचा कामात विजयकुमार गावित यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. त्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन केलं होतं. त्याच विषयावर जिल्ह्याचं राजकारण (Nandurbar Breaking) तापलंय.

आजी-माजी मंत्री एकमेकांना भिडले

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी माजी आदिवासी विकास मंत्री, काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांच्यावर लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय. के सी पाडवींनी लोकांकडून घेतलेले पैसे परत करावे, नाहीतर त्यांना त्रास सहन करावा लागेल अशी टीका गावित यांनी ( Shinde Group BJP Leader Clashes) केलीय.

महायुतीचा अंतर्गत वाद
Mahayuti Celebration: विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीच्या विजयी उमेदवारांचं जंगी सेलीब्रेशन, PHOTO समोर

नेमकं काय घडलं?

राज्यात सत्तेत असलेले शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे महायुतीत एकत्र आहेत. तरी जिल्ह्यात मात्र, हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात असल्याचं अनेकदा समोर आलंय. मंत्री विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले की, आमच्यावर आरोप करणारे चंद्रकांत रघुवंशी यांच्या सर्व खिडक्या बंद झाल्या (Maharashtra Politics) आहेत.

जिल्ह्याचं राजकारण अधिक तापणार?

विरोधक आमच्याकडे नजर लावून आहेत. त्यांनी स्वतःकडे लक्ष देऊन आपल्या खिडक्या का बंद (Nandurbar News) झाल्या? यावर विचार करायला हवा, अशी टीका मंत्री विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर केलीय. यावरून आता जिल्ह्याचं राजकारण अधिकच तापणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

महायुतीचा अंतर्गत वाद
Mahayuti: महायुतीत निधीवरुन वादावादी? कॅबिनेटमध्ये अजितदादा-महाजनांमध्ये खडाजंगी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com