Akola Accident News Saam TV
महाराष्ट्र

Akola Accident News: बैलाला अंघोळ घालताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; दुर्दैवी घटनेनं संपूर्ण गाव हळहळलं

Pola Festival: गणेश ज्ञानदेव गेड शेतकरी यांचा मुलगा समर्थ गणेश गेड पोळ्याच्या निमित्ताने बैल धुण्याकरता शहानुर नदीतील करतवाडी रेल्वे शेत शिवारातील नदी पात्रात गेला होता.

Ruchika Jadhav

Akola News:

राज्यात आज सर्वत्र बैलपोळा उत्साहाने साजरा केला जात आहे. मात्र अकोल्यात बैलपोळ्याच्या सणावर दु:खाचं सावट आलंय. बैल धुण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करोडी येथे ही घटना घडली आहे. गणेश ज्ञानदेव गेड शेतकरी यांचा मुलगा समर्थ गणेश गेड पोळ्याच्या निमित्ताने बैल धुण्याकरता शहानुर नदीतील करतवाडी रेल्वे शेत शिवारातील नदी पात्रात गेला होता.

आपला बैल सगळ्यांंपेक्षा चांगला दिसावा म्हणून तो बैलाला नदीच्या पाण्याने धुवत होता. मात्र अचानक तेथील खडकावरून त्याचा पाय घसरला आणि होत्याचं नव्हतं झालं. पाय घसरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ऐन पोळ्याच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच दहिहंडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तसेच मृतदेह अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT