Pune Crime News : आई-वडिलांनी पोटच्या मुलीला 2000 रुपयांसाठी विकले, येरवडा भागातील संतापजनक घटना

Crime news : अ‍ॅड. शुभम शंकर लोखंडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी पोलिसांनी कारवाई केली.
Yerwada Poilice
Yerwada PoiliceSaam TV

Pune News :

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात भीक मागण्यासाठी आई-वडिलांनी आपल्याच मुलीला विकल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. अवघ्या २ हजार रुपयांसाठी आई-वडिलांनी विकले आहे.

पुण्यातील येरवडा भागात ही चीड आणणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी पती आणि पत्नीला अटक केली आहे. अ‍ॅड. शुभम शंकर लोखंडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी पोलिसांनी कारवाई केली. (Pune News)

Yerwada Poilice
Maval News : गावठी दारू अड्ड्यावर शिरगाव पाेलीसांचा छापा, 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लोखंडे यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना याबाबत माहिती दिली होती. आई वडिलांनी त्यांची ४ वर्षाची मुलगी तीन जणांना २ हजार रुपयांना विकली आहे. समाजातील १० पंचांची त्यासाठी सहमती घेतली आहे. (Latest News on Maharashtra)

Yerwada Poilice
Mumbai Toll Naka : मुंबईच्या वेशीवरील ५ नाक्यावरचा टोल वाढला, नवे दर किती आणि कधीपासून लागू होणार?

भीक मागण्याच्या उद्देशाने या मुलीचा सौदा झाला आहे. बारामती येथील सुपे येथे घेऊन तिला गुलाम बनवून जबरदस्तीने भीक मागायला लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला, आपण या मुलीला दत्तक घेतल्याचा दावा मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com