Maval News : गावठी दारू अड्ड्यावर शिरगाव पाेलीसांचा छापा, 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट

या कारवाईचा धसका बेकायदेशिर दारु विकणा-यांनी घेतल्याची चर्चा मावळात सुरु आहे.
maval news, maval crime news
maval news, maval crime newssaam tv

Maval News : मावळच्या पुसाणे गावाच्या हद्दीत कंजार भट वस्त्ती शेजारी बेकायदा सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी कंजारभट वस्ती येथील गुन्हा दाखल केला आहे.(Maharashtra News)

maval news, maval crime news
Fake seeds cost farmers heavily : शेतकरी आर्थिक गर्तेत, मावळात नामांकित कंपनीच्या नावावर भाताच्या बोगस बियांणाची विक्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुसाणे गावाच्या हद्दीत बेकायदा गावठी दारूअड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. घटनास्थळी बेकायदेशीरपणे हातभट्टीची गावठी दारु तयार करण्यासाठी कच्चे रसायन आणि साहित्य हाेते. सुमारे सात लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

maval news, maval crime news
Tomato Price Drop : बाजार समितीत टोमॅटोला कवडीमाेल दर, शेतकरी चिंतेत; सरकारकडून मदतीची अपेक्षा

या कारवाईनंतर पाेलिसांनी देव शिवम राठोड आणि एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिरगाव पोलीस करीत आहेत. ही कारवाई वनीता धुमाळ (पोलीस निरीक्षक शिरगाव पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com