Akola Crime: जमिनीचा वाद... मुलांचा जन्मदात्या बापावर प्राणघातक हल्ला; कोयत्याने सपासप वार

Akola Latest News: सध्या जितेंद्र ताथोड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv

हर्षदा सोनुने, प्रतिनिधी...

Akola Crime News: शेतीच्या वादातून मुलांनीच जन्मदात्या पित्यावर प्राणघातक हल्ला केला. अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Crime News In Marathi)

Kalyan Crime News
Shivshahi Bus Accident : बसमध्ये 40 प्रवाशी, अन् धावत्या बसचा टायर निखळून 200 फूट लांब पडला पुढे जे घडलं...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोल्याच्या (Akola) बाळापूर तालुक्यातील शेतकरी जितेंद्र ताथोड यांच्यावर मुलांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. घरगुती वादातून हा सगळा प्रकार घडला. जितेंद्र ताथोड यांच्याकडे राम ताथोड व बजरंग ताथोड यांनी घरचा हिस्सा मागितला. मात्र जितेंद्र ताथोड यांनी त्यास नकार दिला.

याच कारणाने दोन्ही भावांनी संगनमताने जीवे मारण्याची धमकी देत वडिलांवर कोयत्याने सपासप वार केले. मुलांनी केलेल्या या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Kalyan Crime News
RS 1 Crore 97 Lakh Stolen : कारमधून एक काेटी 97 लाखांची बॅग लंपास; जाणून घ्या नेमकं काय घडलं

सध्या जितेंद्र ताथोड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन मुलांवर उरळ पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खळबळजनक घटनेने संपूर्ण बाळापूर तालुका हादरुन गेला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com