Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Maharashtra Politics: अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्तास्थापनेत मोठा ट्विस्ट आलाय. कालपर्यंत भाजपासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांनी आज अचानक शिवसेनेला समर्थन दिलं. त्यामुळं शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरील सत्ता कायम राहील.
Maharashtra Politics:
AMBERNATH POLITICAL SHOCKER: SHINDE SENA SUPPORTS NCP, BJP LOSES POWER HOLDsaamtv
Published On
Summary
  • अंबरनाथमध्ये भाजपला शिंदे सेनेकडून मोठा राजकीय धक्का

  • राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय

  • भाजपचे काँग्रेस नगरसेवक फोडण्याचे गणित फेल

नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकालानंतर अंबरनाथ चर्चेत आलंय. आधी काँग्रेसशी युती करून सत्तेचं गणित मांडणाऱ्या भाजपला शिंदे गटानं मोठा धक्का दिलाय. काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला खो देत राष्ट्रवादी आणि शिवसेना तेथे सत्ता स्थापन करणार आहे. अंबरनाथ या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष मिळून उपनगराध्यक्ष केला जाणार आहे. अजित पवार गटाचे उपनगराध्यक्ष पदासाठी सदा मामा पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

Maharashtra Politics:
Maharashtra Politics : शिवसेना दुय्यम भूमिका किती काळ स्वीकारणार? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

यामुळे काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांसोबत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आलेत. त्यांना आता अजित पवार गट राष्ट्रवादीने चार नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय. त्याचसोबत एका अपक्षानेही त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे एकूण ३२ नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आलाय. दरम्यान अंबरनाथमध्ये भाजपनं केलेल्या अनोख्या युतीमुळं विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तेथील राजकारणाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होतेय. मात्र शिंदे गटानं भाजपची खेळी उलथवून लावत त्यांना सत्तेपासून दूर केलंय.

Maharashtra Politics:
Rajya Sabha Election: राजकारण तापलं! ५ जागांसाठी महाआघाडीत बिघाडी; NDAमध्येही हालचालींना वेग

दुसरीकडे अंबरनाथमध्ये भाजपचे एकूण १६ नगरसेवक निवडून आले होते तर शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आधी काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र वरिष्ठांकडून त्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने काँग्रेसचे १० नगरसेवक फोडले. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. इतकेच नाही तर, भाजप काँग्रेसचे नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत सत्ता मिळवण्यावरून खूप आशावादी होती.

मात्र श्रीकांत शिंदेंची खेळीनं भाजपचा डाव उलथला गेलाय. शिवसेनेचे सर्व नगरसेवक ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी गोळा झाले. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे २७, अजितदादांचे ४ आणि एका अपक्षाच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय. त्यांनी तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय.

सोमवारी १२ जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचा उपनगराध्यक्ष बसेन अशी चर्चा होती. मात्र आज श्रीकांत शिंदेंनी खेळलेल्या राजकीय खेळणीनं भाजपला चीपट केलंय. राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com