Ajit Pawar's Reaction On Budget 2023
Ajit Pawar's Reaction On Budget 2023 saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar on Budget : राज्याचे अर्थमंत्री राहिलेल्या अजित पवारांची अर्थसंकल्पावर कडक शब्दात प्रतिक्रिया

Chandrakant Jagtap

Ajit Pawar's Reaction On Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी करसवलतीसह अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाचं एकीकडे सत्ताधारी कौतुक करत असताना दुसरीकडे विरोधकांनी या अर्थसंकल्पाला चूनावी जुमला म्हटलं आहे. राज्याच्या अर्थमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात मुळ प्रश्नांना बगल दिली असं म्हटलं आहे.

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेव हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून हा चूनवी जूमला आहे असे म्हटले आहे. अमृत काल नाव देऊन अर्थसंकल्पात मुळ प्रश्नाला बगल देण्यात आली असे पवार म्हणाले. तसेच पूर्वीच्याच घोषणा पुनरुच्चार करण्यात आळा असे ते म्हणाले.

महाराष्ट्र केंद्राला सर्वात जास्त कर देणारं राज्य असून या अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबई काही मिळालं नाही. नऊ राज्याच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांना निधी देण्यात आला. आपल्याला झुकत माप मिळाले नाही, हा महाराष्ट्रवर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

गोरगरिबांचा बजेट वेगळं आहे का? - भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन कोटींवरून लाखांवर आणि आता हजारांवर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की हे मिडल क्लासचं बजेट आहे. मग गोरगरिबांचा बजेट वेगळा आहे का? त्यांच्या कार्यशाळेत बजेट शिकायला जायला हवं, असं भुजबळ म्हणालेत,

भुजबळ म्हणाले की, देशातल्या सर्वात श्रीमंत माणसावर गंभीर आरोप होत आहेत. हिडनबर्ग आणि नाथन यांनी केलेले दावे हे अत्यंत गंभीर आहेत. मात्र आपले शेठ याला देशावरचा हल्ला म्हणत आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी आणि सरकारने स्पष्ट करावं की हा खरंच देशावरचा हल्ला आहे का? जर तसा असेल तर या हल्ल्याला तोंड कसं देणार हेही स्पष्ट करावं. यामुळे अर्थव्यवस्थेत मोठा खड्डा पडणार आहे. यामध्ये एलआयसी आणि एसबीआय सारख्या संस्थांचे लाखो करोडोंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

SCROLL FOR NEXT