Budget News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून हे शेवटचे अर्थसंकल्प असेल. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
'आजचा या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प गरीबांना आधार मध्यमवर्गीयांना दिलासा व उद्योगाला उभारी देणारा आहे, अशा शब्दात अर्थसंकल्पाचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पावर भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले, 'केंद्रीय अर्थसंकल्प गरीबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा आणि उद्योगांना उभारी देणारा आहे. हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. मी राज्य सरकारच्या वतीने या अर्थ संकल्पाचे स्वागत करतो. सहकार क्षेत्राला मोठा दिलासा देणारा निर्णयही या अर्थसंकल्पात घेतलेला आहे'.
'सहकार क्षेत्राबाबत आम्ही नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन अडचणीत आलेल्या साखर उदयोगाबाबत चिंता व्यक्त केली. त्यानुसार १० हजार कोटी मफ करण्याचा निर्णयही केंद्राने घेतला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
'कर रुपयात पाचलाखांची वाढ करत ७ लाख इतकी केली. देशाचा आर्थिक विकास इंफ्रा, शहरांचा विकास यावर भर देण्यात आला आहे.शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. प्रत्येक घटकाला साजेसा अर्थसंकल्प आहे.या अर्थसंकल्पामुळे वन ट्रिलियन डॉलरचं टार्गेटही पूर्ण होईल. हा अर्थसंकल्प देशव्यापी असतो', असे एकनाथ शिंदे पुढे म्हणाले.
'अनेक प्रकल्प, कृषीविभाग या सर्वांसाठी म्हणजेच राज्यसरकार अनेक प्रकल्पांसाठी मदत मागेल. विरोधक हा बजेट चांगला आहे असं कसं म्हणणार, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.
'राज्य सरकार सार्वजनिक वाहने इलेक्ट्रीक करत आहोत. जेणेकरून प्रदुषणही कमी होईल. निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का ? विरोधीपक्षाने त्याचं स्वागत केलं पाहिजे. ९ पटीने बजेट वाढवलेलं आहे.या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना (Farmers) केंद्रबिंदू ठरवून बनवण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेत केलेल्या वाढीचं स्वागत करायला हवं, राज्यातील कुणीही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.