Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: ...तर लोक आम्हाला जोड्याने मारतील; अजित पवार असे का म्हणाले?

People Will Hit Us with Shoesउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई गोवा रस्ते महामार्गाच्या कामसंदर्भात बैठक घेत आधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

Omkar Sonawane

मुंबई आणि गोवा या रस्त्याचे काम तब्बल 16 ते 17 वर्षांपासून रखडले आहे. राजकारण्यांचे हस्तक्षेप, कोर्टात गेलेले खटले आणि कंत्राटदार पळून जाणे असे विविध कारणे या महामार्गाबद्दल सांगितले जातात. कुठे एकेरी, तर कुठे दोन्ही बाजूला खड्डेच खड्डे अशी परिस्थिति या महामार्गाची आहे. जो व्यक्ति कंबरदुखी आणि मानदुखीने त्रस्त असेल आणि ज्याला नाही त्याला हे सगळे आजार सुरू होतील असा हा महामार्ग आहे. कित्येक लोकांचे या महामार्गाने बळी घेतलेले आहेत.

अनेक महिलांचे सिंदूर या महामार्गाने पुसले आहे. काही वर्षांपूर्वी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. येत्या जून महिन्यांपर्यंत हा रस्ता तयार होईल असा त्यांनी दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लोणेरे येथे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महामार्गाच्या कामात होणाऱ्या दिरंगाईवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचक इशारा दिला.

कामं वेळेत झाली पाहिजेत. कुठलाही मुद्दा प्रलंबित राहता कामा नये. जर काम पूर्ण झालं आणि तरीही काही तक्रारी राहिल्या, तर लोकं तुम्हालाही आणि आम्हालाही जोड्याने मारतील, अशा शब्दांत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

महामार्गाच्या निधीबाबत बोलताना पवार म्हणाले, नितीन गडकरींकडे आधी निधीसाठी मागणी करू, त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. आपल्याला नागरिकांच्या सोयीसाठी जे काही करावं लागेल ते करायचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT