Uddhav Thackeray: मिनी विधानसभेसाठी ठाकरेंचा मास्टरप्लॅन ठरला, शिवसेना भवनाच्या बैठकीत काय काय झालं?

Uddhav Thackeray’s Masterplan for Mini Assembly Elections : उद्धव ठाकरे यांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मास्टरप्लॅन आखला आहे. शिवसेना भवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, १९ जूनपर्यंत सर्व नेत्यांना आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Maharashtra Local Body Elections : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. आज शिवसेना भवनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरेंकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकाचे मास्टारप्लान ठरवल आहे. ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीतील पराभव धुवून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणर आहे. मिनी विधानसभेसाठी ठाकरेंकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. ठाकरेंनी या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी शिवसेना नेते, उपनेते, राज्य संघटकांवर महत्त्वाची जाबाबदारी सोपवली आहे.

ठाकरेंनी ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली, त्या नेत्याला स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा मतदारसंघातील स्थितीचा आढावा घ्यायचा आहे. ही सर्व माहिती ठाकरेंना १९ जूनपर्यंत शिवसेना भवनात नेत्यांना सादर करायचा आहे. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

Uddhav Thackeray’s Masterplan for Mini Assembly Elections
Shocking: कोळंबी प्रकल्पावर विषप्रयोग, ४ टन कोळंबी मृत, शेतकऱ्याचे १८ लाखांचे नुकसान|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com