Maharashtra politics : अजित पवारांच्या स्वागतासाठी रोहित पवारांची बॅनरबाजी, कर्जत जामखेडमध्ये नेमकं काय घडतंय? Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra politics : अजितदादांच्या स्वागतासाठी रोहित पवारांची बॅनरबाजी, कर्जत जामखेडमध्ये नेमकं काय घडतंय?

Rohit Pawar Ajit Pawar banners : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जामखेड दौऱ्यावर, रोहित पवार यांच्या नावाने लागलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण, राम शिंदेंच्या नाराजीवर पडणार विरजण का?

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Rohit Pawar and Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच जामखेडच्या दौऱ्यावर येत आहे. अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये रोहित पवार यांच्या नावानेही बॅनर आहेत. या बॅनरबाजीची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. जामखेडमध्ये नेमकं काय घडतेय? या चर्चेने जोर धरला आहे.

Rohit Pawar and Ajit Pawar

एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याच निर्णय घेतला. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी रोहित पवार यांच्याविरोधात मतदारसंघात एकही सभा घेतली नाही. अजित पवार यांनी ही बाब रोहित पवारांना बोलून दाखवली होती. त्यावर राम शिंदे यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता अजित पवार कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर रोहित पवार यांचा फोटो आणि उल्लेख आहे. कर्जत-जामखेडच्या पावन भूमीत स्वागत, आशा आशयाचे बॅनर आहेत.

अजित पवार जामखेडच्या दौऱ्यावर का?

उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवार कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर येत आहेत. शिव-फुले-आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्ताने आज सायंकाळी सहा वाजता जामखेड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहे. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेहेही असणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच अजित पवार यांचा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा असणार आहे.

राम शिंदेंची नाराजी दूर?

विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी एकही सभा न घेतल्यामुळे आमदार राम शिंदे यांनी नाराज व्यक्त केली होती. मी तुझ्या मतदारसंघात आलो नाही, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं.. असे अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना बोलून दाखवले होते. यावरून आमदार राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला होता. त्यानंतर प्रथमच आता दोघेही एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रथमच जामखेड शहरात येत आहेत. विधानसभेनंतर सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील एकाच व्यासपीठावर येत असल्यामुळे जामखेडमधून तिघेही आज काय बोलणार याकडेच जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT