Maharashtra politics : एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? हेलिकॉप्टरनं अचानक गाठलं दरेगाव, ३ दिवस असणार मुक्काम

Maharashtra deputy CM news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दरेगाव दौरा चर्चेत. महायुती सरकारमध्ये नाराजी आणि निधी वाटपाबाबत अमित शहा यांच्याकडे व्यक्त केलेली खदखद आता चर्चेचा विषय ठरत आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Shiv Sena Vs NCP
Published On

Eknath Shinde Visits Daregaon : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे आपली खदखद व्यक्त केल्याचं बोललं जातेय. महायुतीमधील निधी वाटप, रायगड-नाशिकमधील पालकमंत्रिपदावरून तक्रार केल्याची चर्चा आहे. या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे अचानक दरे गावात गेले आहेत. एकनात शिंदे पुढील तीन दिवस दरे गावात मुक्कामी असणार आहेत. एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावात गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक हेलिकॉप्टरने दरेगावात गेले आहेत. पुढील तीन दिवस ते येथेच मुक्काम करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी अचानक दरेगाव गाठल्यामुळे त्यांची महायुतीतील सहकाऱ्यांवर नाराजी असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे नाराजी व्यक्त करण्यासाठी दरेगावात जातात, असा आरोप याआधी विरोधकांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव दौऱ्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Maharashtra Politics
Kunal Kamra : शिंदे गटाला झटका, कुणाल कामराला कोर्टाचा दिलासा, कोर्टात नेमकं काय झालं?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, शिंदे यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरही असू शकतो. दरम्यान, एकनाथ शिंदे बुधवारी दरेगावात पोहचल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळले. शिंदेंच्या या दौऱ्यामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Maharashtra Politics
DC vs RR Super Over : सुपरओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली, पाहा प्रत्येक चेंडूचा थरार, नेमकं काय काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com