Ambadas Danve Statement On Ajit Pawar: saam tv
महाराष्ट्र

'अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार'; दानवेंच्या दाव्याने मोठी खळबळ

Ambadas Danve Statement On Ajit Pawar: पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार आहेत, असा खळबळजनक दावा करण्यात आलाय.. मात्र हा दावा कुणी केलाय? आणि अजित पवारांनी राजीनाम्यासंदर्भात नेमकं काय वक्तव्य केलंय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार अंबादास दानवेंचा दावा

  • पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणामुळे राजकीय दडपण वाढल्याचं म्हटलं जात आहे.

  • अजित पवारांनी चर्चांना फेटाळून लावलंय.

पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचं नाव समोर आलंय. त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय. त्यातच आता अंबादास दानवेंनी खळबळजनक दावा केलाय. वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवारांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचाच सरकारला इशारा दिला असा मोठा दावा दानवेंनी केलाय. त्यामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ माजलीय.

दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र दानवेंचा दावा खोडून काढलाय. खरंतर पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील महार वतनाची 1800 कोटींची जमीन पार्थ पवरांच्या कंपनीनं अवघ्या 300 कोटीत खरेदी करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं. त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्यावर अजित पवारांनीही भुवया उंचावणारी प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे पुढचा काळात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे.

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आलंय. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी बॅकफूटला गेलीय. सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर 25 सप्टेंबर 2012 ला अजित पवारांनी राजीनामा दिला होता. त्याप्रमाणेच आता अजित पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात डॅमेज कंट्रोलसाठी राजीनामा देणार आणि पुन्हा क्लिनचीट मिळवून मंत्रिमंडळात परतणार की राजीनामा न देण्यावर ठाम राहणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: हुंडा प्रकरणात तडजोड केली नाही, नवऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या; बायकोचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकले

Sev Puri: मुंबईची स्ट्रीट स्टाईल चटपटीत शेवपुरी घरीच बनवा, रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: नितीन गिलबिले हत्ये प्रकरणी एकाला अटक

Ind Vs Sa: बुमराहचा 'पंच'! टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका 159 रन्सवर ऑलआऊट

काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे – अंबादास दानवेंचा सल्ला|VIDEO

SCROLL FOR NEXT