Ajit pawar marathi news 
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांच्या पक्षाला कार्यालयच नाही, एकनाथ शिंदेंनाही मोठा धक्का

Ajit pawar marathi news : एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. यावरुन राजकीय चर्चेला उधाण आलेय.

Namdeo Kumbhar

नवी दिल्ली : लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले. अजित पवार यांच्या पक्षाला कार्यालय मिळालेच नाही. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवरा यांच्या पक्षाला संसदेतील पक्ष कार्यालय देण्यात आलेय. बुधवारी शरद पवार यांच्या पक्षाला कार्यालय देण्यात आले नव्हते, पण आज लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रका काढत कार्यालय दिल्याचं सांगण्यात आले.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवार यांनी आमदारांच्या संख्याबळानुसार पक्ष आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाकडून त्यांना पक्ष आणि कार्यालय मिळाले. पण लोकसभामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालेच नाही. त्यांच्या पक्षाचा फक्त एकच खासदार निवडून आला. परिणामी त्यांना संसदेत पक्ष कार्यालय मिळालेच नाही. उलट शरद पवार यांना नवे चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाले. पण त्यांनी लोकसभेत करिश्मा करत ८ जागांवर विजय मिळवला. शरद पवार यांच्या पक्षाला संसदेत पक्ष कार्यालय देण्यात आलेय.

अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही -

खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच सोपण्यात आलेय. लोकसभा सचिवालयाने नवं पत्रक काढत अजित पवारांना धक्का देण्यात आलाय. नव्या पत्रकात NCP Shardchandra Pawar Party असा उल्लेख करण्यात आलाय. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला मात्र कार्यालय नाही.

एकनाथ शिंदेंनाही धक्का -

एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवले. पण लोकसभा संसदेतील पक्ष कार्यालयात त्यांच्या पक्षाच्या नावापुढे शिंदे असा उल्लेख कऱण्यात आलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा “शिवसेना (शिंदे)” असा उल्लेख करण्यात आलाय. एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर पक्षाचा उल्लेख फक्त ‘शिवसेना’ म्हणून केला जावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही असल्याचे दिसतात.

त्यात आता लोकसभा सचिवालयाकडूनच पक्षाचा उल्लेख ‘शिवसेना (शिंदे)’ असा करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात १२८ क्रमांकाचे दालन तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १२८ A हे दालन मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: हॉटेलमध्ये गेला, चहा अन् बन-मस्का मागवला, पहिल्याच घासात काचेचा तुकडा, पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेतील प्रकार | VIDEO

Kapil Sharma Earnings : कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो ‘इतके’ रूपये, आकडा वाचून थक्क व्हाल

CIDCO: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सिडको भूखंडांचे होणार फ्री-होल्डमध्ये रूपांतर; कशी असणार प्रक्रिया?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT