ajit pawar Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : महायुती सरकारचं खातेवाटप कधी होईल? अजित पवारांनी शपथविधी सोहळ्यानंतर दिली महत्वाची माहिती

Ajit Pawar Latest News : नागपुरातील राजभवनात महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी ३९ मंत्र्यांची शपथ घेतली. या शपथविधीनंतर कोणाला कोणते खाते मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : महायुती सरकारच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवनात पार पडला. महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीसाठी महायुतीच्या जवळपास सर्व आमदारांनी हजेरी लावली. महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर महायुतीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महायुतीच्या खातेवाटपाबाबत माहिती दिली. महायुती सरकारचं खातेवाटप येत्या २-३ दिवसांत जाहीर होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

शपथविधी सोहळ्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, 'अलीकडे पायंडा पडला आहे की, विरोधक चहापानावर बहिष्कार टाकतात. त्यामुळे चहापान कराव की नको? हा एक प्रश्न पडला आहे. विरोधक संख्येने कमी असले तरी महत्वाचे प्रश्न चर्चेला आल्यावर त्याची उत्तर दिली जातील. येत्या २-३ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खातेवाटप जाहीर करतील. आम्हाला प्रचंड असं बहुमत आहे म्हणून रेटून काम नेणार नाही. आम्ही विरोधकांकडे दुर्लक्ष करणार नाही, अशी ग्वाही देतो'.

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. सगळे माध्यम मंत्रिमंडळचे वाटप करत होते. आम्ही पाहत होतो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खातेवाटप होईल. नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो. ते पुन्हा आले. प्लेयर तेच आहेत, मॅच नवीन आहे'.

'आम्ही टीम म्हणून काम केले. सभागृहात म्हणालो होतो की, आम्ही दोघे मिळून दोनशे आमदार निवडून आणू, असे म्हणालो होतो. अजितदादा सोबत असल्याने 232 बोनस सहित आले. आम्ही जनतेच्या प्रती उत्तरदायी आहे. विदर्भाला न्याय देण्यासाठी आम्ही निर्णय घेतले, असे शिंदे पुढे म्हणाले.

विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'आम्ही लोकाभिमुख सरकार दाखवून दिले. आमचा स्ट्राईक रेट देशात नंबर 1 होता, म्हणून विरोधकांना नाकारत जागा दाखवली. विरोधकांना विरोधीपक्ष नेता म्हणून संख्याबळ आणता आले नाही. लोकशभा निकालानंतर मंत्रिमंडळ महाविकास आघाडीने वाटून टाकले, पण जनतेने आम्हाला कौल दिला. विरोधकांची परंपरा आहे. जनतेने विरोधकांवर बहिष्कार टाकला आहे. सुदृढ लोकशाहीचे संकेत दिले. सरकार चुकत असेल तर त्यांनी बोलावे. विरोधाला विरोध म्हणून बोलू नये'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT