Maharashtra Cabinet Expansion : पुणे जिल्ह्याला ४ मंत्रिपदे, कोणा कोणाची लागली मंत्रिमंडळात वर्णी?

Maharashtra Cabinet Expansion News: पुणे जिल्ह्याला ४ मंत्रिपदे मिळाली आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
mahayuti government
Maharashtra Cabinet ExpansionSocial Media
Published On

नागपूर : महायुती सरकारचा नागपुरात मोठ्या दिमाखात शपथविधी होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गज नेतेमंडळींनी हजेरी लावली आहे. महायुती सरकारच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. महायुती सरकारच्या शपथविधी होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील ४ नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळा नागपुरातील राजभवनात पार पडला जात आहे. या सोहळ्यात ३३ जणांची कॅबिनेटपदी वर्णी लागली. तर ६ जणांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील ४ नेत्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि दत्ता भरणे यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. या नेत्यांची वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

mahayuti government
Mahayuti Cabinet Expansion: गोपीनाथ मुंडे यांचा वारसा, राजकारणात चढउतार, धनंजय मुंडेंचा धगधगता राजकीय प्रवास

महायुती सरकारचा शपथीविधी होताच पुण्यात भाजपकडून जल्लोष पाहायला मिळाला. पुण्यातून चंद्रकात पाटील आणि माधुरी मिसाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे दिसून आले. कोथरूड येथे कर्वे चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. चंद्रकात पाटील तिसऱ्यांदा तर माधुरी मिसाळ पहिल्यांदा शपथ घेतली आहे.

mahayuti government
Mahayuti Cabinet Expansion: शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस तोडलं; मोठा निर्णय घेत आमदारानं दिला राजीनामा

पुण्यात मंत्रिपदासाठी इच्छाकामंध्ये होती चढाओढ

संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुकांची चढाओढ पाहायला मिळाली होती. 12 आमदार आणि विधान परिषदेत दोन आमदाराने मुंबईत तळ ठोकला होता. इच्छुक आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदांसाठी लॉबिंग सुरू केली होती. राष्ट्रवादी आणि भाजपकडून काही नावे निश्चित झाल्यानंतर इतरांनाही संधी मिळावी म्हणून हालचाल सुरू केल्या होत्या.

मातंग समाजाला प्रतिनिधित्व म्हणून आमदार सुनील कांबळे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे हे सुद्धा प्रयत्न करत होते. तिन्ही पक्षांकडून एकेक मंत्रिपद दिले तरी किती मंत्रिपद पुण्यात देणार हे अनिश्चित असल्याने नेमकं कुणाला मिळणार यासाठी चढावोढ सुरू होती. 18 पैकी बारा आमदार आणि दोन विधान परिषदेतील आमदारांनी मुंबईत मुक्कामी राहून मंत्रिपद मिळावे म्हणून हालचाली सुरु केल्या होत्या.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील आमदार

कसबा

भाजप- हेमंत रासने

कोथरूड

भाजप - चंद्रकांत पाटील

पर्वती

भाजप - माधुरी मिसाळ

पुणे कॅन्टोन्मेंट

भाजप, सुनील कांबळे

वडगाव शेरी

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) बापू पठारे

खडकवासला

भाजप- भीमराव तापकीर

शिवाजीनगर

भाजप - सिद्धार्थ शिरोळे

mahayuti government
Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

हडपसर

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - चेतन तुपे

बारामती

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - अजित पवार

इंदापूर

राष्ट्रवादी काँग्रेस (AP)- दत्ता भरणे

आंबेगाव

राष्ट्रवादी काँग्रेस (AP)- दिलीप वळसे पाटील

जुन्नर

अपक्ष - शरद सोनवणे

शिरुर

राष्ट्रवादी काँग्रेस (AP)- माउली कटके

पुरंदर

शिंदे गट - विजय शिवतारे

भोर

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - शंकर मांडेकर

मावळ

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - सुनील शेळके

पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - अण्णा बनसोडे

चिंचवड

भाजप - शंकर जगताप

भोसरी

भाजप - महेश लांडगे

खेड

ठाकरे गट - बाबाजी काळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com