Ajit Pawar On Supreme Court Verdict
Ajit Pawar On Supreme Court Verdict saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar On Supreme Court Verdict: फक्त मी दिल्लीला गेलो असं काही सांगू नका, निकालानंतर अजित दादांची गुगली

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल दिला आहे. या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात राजकारणाची पुढील दिशा कशी असेल याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे. या निकालावर विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबत अजित पवार यांना विचारले तेव्हा त्यांनी त्यांच्या खास शैलीत यावर उत्तर दिलंय.

अजित पवार निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. नीट माहिती घेतल्याशिवाय मी बोलणार नाही. मी जे बोललो तेच घडलं, पण त्यावर मी काही बोलणार नाही. नो कॉमेंट... अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. परंतु गाडीत बसून जाताना त्यांना गाडी थांबवली आणि माध्यमांना 'फक्त मी दिल्लीला गेलो असं काही सांगू नका' असा टोला मारत गुगली टाली.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. राज्यपालांनी घेतलेले निर्णय न्यायालयाने अवैध ठरवले असून विधीमंडळ पक्षाने नाही तर मूळ पक्षाचा व्हीपच वैध असेल असं न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. परंतु 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे शिंदे सरकारला काही दिवसांसाठी संजीवनी मिळाली आहे. (Breaking News)

दरम्यान 'राज्यपालांनी दिलेला बहुमत चाचणीचा आदेश बेकायदेशीर होता. त्यांच्यासमोर सबळ पुरावे नव्हते. पण उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही कारण उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांचा राजीनामा सादर केला होता असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Political News)

ठाकरे गटात जोरदार हालचालची!

सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर ठाकरे गटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. निकालानंतर लगेच ठाकरे गटाने सर्व आमदारांची बैठक बोलवली आहे. शनिवारी 13 मे रोजी सर्व आमदारांना मातोश्रीवर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे 13 तारखेला ठाकरे गटाचे सर्व आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ठाकरे गट पुढील रणनीती ठरवणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Non Stick Pan : चायनीज बनवताना वापरा 'या' टिप्स; नुडल्स आणि राइस कढईला चिटकणार नाहीत

Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

Maharashtra Politics : छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो"

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

SCROLL FOR NEXT