Aaditya Thackeray Tweet: 'सत्तासंघर्षावरील निकालानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदे- फडणवीसांवर हल्लाबोल; ट्वीट करत म्हणाले...

Aaditya Thackeray On Supreme Court Result: राज्याच्या सत्ता संघर्षावरील निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Aaditya Thackeray Latest Statement on Cm Eknath Shinde
Aaditya Thackeray Latest Statement on Cm Eknath ShindeSaam TV
Published On

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात अनेक ताशेरे शिंदे गटावर ओढण्यात आले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आम्ही जैसे थे परिस्थिती करत सुई मागे आणू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे.

एवढंच नाही तर आमदारांना अपात्र ठरवायचं का नाही? याचे पूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. राज्याच्या राजकारणातील या बहुप्रतिक्षित निकालावर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये त्यांंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Aaditya Thackeray Latest Statement on Cm Eknath Shinde
Devendra Fadanvis News: 'नैतिकतेचा मुलामा चढवू नका..' सुप्रीम निकालानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचले

काय म्हणाले आदित्य ठाकरे...

राज्याच्या सत्ता संघर्षावरील (Maharashtra Politics) बहुप्रतिक्षित निकाल अखेर सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. ज्यावरुन ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. (latest Marathi News)

काय म्हणाले आदित्य ठाकरे...

"असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक आजच्या निकालानंतर, मिंध्ये- भाजप गद्दार सरकारकडे पाहण्याचा हा एकमेव मार्ग आहे," अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केली आहे. तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी" पूर्वीच्या राज्यपालांची भूमिका ही सरकार ताब्यात घेणे आणि लोकशाही आणि संविधान दडपून टाकणे अशीच होती. त्यांनी राज्यपाल म्हणून नव्हे तर पक्षाचा माणूस म्हणून काम केले," असा घणाघातही यावेळी केला.

Aaditya Thackeray Latest Statement on Cm Eknath Shinde
CM Eknath Shinde: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अखेर सत्याचा विजय झाला"

एकनाथ शिंदेंवर निशाणा...

या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवरही (Eknath Shinde) जोरदार निशाणा साधला आहे. "जर काही नैतिकता आणि लाज उरली असेल तर असंवैधानिक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांचा सत्तेचा लोभ उघड आहे, पण नैतिकता आणि लोकशाही सर्वोच्च असली पाहिजे," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. (Aditya Thackeray On Aditya Thackeray)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com