Political News : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात थुंकण्याच्या मुद्द्यावरुन वाकयुद्ध रंगलं आहे. थुंकण्याच्या कृतीवरून अजित पवार यांनी राऊतांवर निशाणा साधला होता.
त्यानंतर संजय राऊतांनी धरणाबदलच्या वक्तव्याची आठवण करुन देत अजित पवारांना रोखठोक उत्तर दिलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी काहीशी माघार घेत पुन्हा एकदा संजय राऊतांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी आधी 'नो कॉमेंट्स' म्हटलं. त्यानंतर संजय राऊत यांच्या बोलण्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांना काय बोलायचे हा त्यांचा अधिकार आहे, असंही अजित पवार म्हणाले. अजित पवार चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी गेले होते.
नेमकं काय घडलं?
संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारल्यार ते थुंकल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर अजित पवार यांनी प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं असा सल्ला राऊतांना दिला होता. अजित पवारांच्या सल्ल्यानंतर संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका करत धरणामध्ये **** पेक्षा थुंकणं कधी चांगलं, असं म्हटलं होतं. (Political News)
शिवसेना शिंदे गट आक्रमक
संजय राऊत यांच्या कृतीचा शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र निषेध केला जात आहे. राज्यभर विविध ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं जात आहे. भाजप आणि शिवसेनेनेच्या अनेक नेत्यांना संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.