Ajit Pawar News saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : नागपूरनंतर संजय राऊत ....; सरकारबाबत राऊतांच्या दाव्यावर काय म्हणाले अजित पवार

संजय राऊतांनी कोणत्या आधारावर असं वक्तव्य केलं हे आपल्याला माहिती नसल्याचं अजित पवार म्हणालेत.

साम टिव्ही ब्युरो

मंगेश कचरे

Political News : संजय राऊतांच्या सरकारवरील वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकद चर्चेला उधाण आलं आहे. १५ दिवसांत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, राऊतांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी कोणत्या आधारावर असं वक्तव्य केलं हे आपल्याला माहिती नसल्याचं अजित पवार म्हणालेत. (Political News)

बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांना संजय राऊतांच्या दाव्यवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, "संजय राऊत यांच्या बद्दल काहीही बोलायचे नाहीये. नागपूरनंतर संजय राऊत आणि माझी भेट झालेली नाही. त्यांना ही माहिती कुठे मिळाली मला माहीत नाही. त्यामुळे त्यांनी वक्तव्य कोणत्या आधारे केलं हे मी तुम्हाला कसे सांगणार?"

उद्धव ठाकरे मला म्हणाले की मी लक्ष घालून परवानगी घेतो. परवानगी द्यायला आढेवेढे घेतले जातात. अनेक अटी घातल्या जातात. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत अशी भाषणे करायची असतात. भाजपच्या नेत्यांच्या मनात काय आहे याच्याशी माझा काय संबंध. पत्रकारांना दांडके दिले तर तुम्ही काहीही बोलत असतात, असे म्हणत अजित पवार पत्रकारांवर चिढले.

...तर तुमच्या का पोटात दुखतं?

पुढे अमृता फडणवीस यांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर केलेल्या वक्तव्यवर अजित पवार म्हणाले की, कुणी मला जर चांगले म्हणत असेल तर तुमच्या का पोटात दुखतं? प्रत्येकाने चांगले काम करावे जेणेकरून लोकांनी त्याला चांगलं म्हणावं. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो हे पाहिल्यावर आपण त्यावर चर्चा करू

खारघर दुर्घटनेत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी अजित पवारांनी केली होती. त्यावर ते म्हणाले की, "न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी मी केली. ही मागणी मान्य करायची का नाही हा राज्यसरकार प्रश्न आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रम करताना निष्काळजीपणा निश्चितपणे झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यास वेळ काय घ्यावी हे समजायला हवे होते. लोकं मृत पावली. सर्व अधिकाऱ्यांची चौकशी केल्यावर ती चौकशी नी पक्षपाती पद्धतीने होईल असं वाटत नाही. म्हणून आम्ही म्हणालो न्यायालयीन पद्धतीने चौकशी करा."

शंभू राज देसाई यांच्या प्रश्नावर अजित पवार संतापले.

हे सरकार येऊन दहा महिने झाले आहेत. विरोधी पक्षाने अनेक कार्यक्रम एकत्रित पद्धतीने केले आहेत. त्यामुळे विरोधकांचे काम आहे टीका करणे. भेगा पडल्या असं सत्ताधारी म्हणणार. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे वकतव्य करतात. मुख्यमंत्री यांच्यासह 43 मंत्री असतात. पण आता किती मंत्री आहेत. ते अनेक मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे असे वकतव्य करीत असतात, अशी टीका अजित पवारांनी शंभू राज देसाईंवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कणकवली रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ आला समोर

Dahi Poha Recipe : अवघ्या ५ मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, आंबट-गोड 'दही पोहे' एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

SCROLL FOR NEXT