Ajit Pawar Bag checking saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांच्या बॅग झडतीचा VIDEO, डब्यात चकल्या, लाडू

Ajit Pawar Bag checking : अजित पवार यांनी बॅग झडतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Nandkumar Joshi

Ajit Pawar Bag checking Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बॅग बुधवारी निवडणूक कर्मचाऱ्यांनी तपासली. निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरमधून गेले असता, त्यांची बॅग तपासण्यात आली. यावेळी त्यांच्या बॅगमधील डब्यात चकल्या आणि लाडू सापडले. तपासणीनंतर अजित पवारांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. मुक्तपणे आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी अशा गोष्टी करणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार (Ajit Pawar) हे प्रचारासाठी निघाले असता, बारामतीतील भवानीनगर हेलिपॅडवर निवडणूक कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरसह त्यांच्याकडील बॅगांची तपासणी केली. या तपासणीचा व्हिडिओ स्वतः अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी पोस्टद्वारे प्रतिक्रियाही दिली.

सर्वांनी कायद्याचा आदर राखला पाहिजे. देशातील लोकशाहीचे अखंडत्व जपण्यासाठीच्या प्रयत्नांचे समर्थन केले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

व्हिडिओमध्ये काय आहे?

अजित पवार यांनी एक्स हँडलवर बॅग झडतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अजित पवार हे हेलिकॉप्टरमध्ये बसलेले आहेत. तर निवडणूक कर्मचारी त्यांच्याजवळील बॅगांची झडती घेत आहेत. बॅगांची झडती घेत असताना, अजित पवारांच्या बॅगमधील डबा आणि पिशवीमध्ये दिवाळीसाठीचा फराळ सापडला. एका डब्यात लाडू तर दुसऱ्या एका पिशवीत चकल्या दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्याही बॅगांची तपासणी

तत्पूर्वी, भाजप महाराष्ट्रच्या एक्स हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगांची तपासणी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याचे दिसते. केवळ दिखाव्यासाठी संविधानाचा आधार घेणे योग्य नाही आणि सर्वांनी संवैधानिक व्यवस्थेचं पालन केले पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत बॅग तपासणीचा मुद्दा तापला असून, देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे प्रतिक्रिया दिली आहे. बॅगा तपासण्याच्या मुद्द्यावरून विरोधक राजकारण करतात. माझ्यासह मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बॅगा नियमित तपासल्या जातात. आम्ही कधीही या गोष्टीचा कांगावा केला नाही, असंही फडणवीस यांनी सुनावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

SCROLL FOR NEXT