Opposition leaders raise questions over VSR company as political heat rises after Ajit Pawar plane crash. saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: VSR कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

Sanjay Raut Alleges Over Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा अपघात झाला त्या VSR विमान कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय.. त्यावरुन कसं वातावरण तापलंय ? आणि रोहित पवारांनीही सरकारला कसं घेरलंय ? पाहूयात.

Bharat Mohalkar

  • अजित पवारांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीवर संशय

  • संजय राऊतांचा भाजप नेत्याच्या गुंतवणुकीचा आरोप

  • रोहित पवारांकडून सरकारवर कारवाई न केल्याबाबत सवाल

अजित पवारांच्या विमान अपघाताला 15 दिवस उलटून गेलेत. रोहित पवारांसह अनेक नेते व्हीएसआर कंपनीवर संशय व्यक्त करत आहेत. मात्र अजूनही व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यात आलेली नाही. हाच धागा पकडून रोहित पवारांनी VSR कंपनीवर कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित करत सरकारला घेरलंय.

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट केलं जातं. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?

देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीनं या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी.

रोहित पवारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर आता संजय राऊतांनीही या प्रकरणी मोठा दावा केलाय.. VSR कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक असल्यानेच कारवाई केली जात नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. खरंतर याआधीच रोहित पवारांनी पायलटवर संशय व्यक्त केलाय.. तर पायलट अपघाताच्या आधी कुणा कुणाला भेटला, त्याचीही चौकशीची मागणी केलीय.

खरंतर राऊतांनी व्हीएसआर कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक असल्याचा दावा केलाय.. मात्र व्हीएसआर कंपनीत गुंतवणूक असलेला भाजपचा नेता कोण? आणि त्या नेत्याच्या दबावामुळेच व्हीएसआरची चौकशी होत नाही का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT