विमान कंपनीवर 1 वर्षांपासून बंदी होती.
दादांच्या मृत्यूचे गूढ अजूनही महाराष्ट्रासमोर कायम आहे.
अपघात प्रकरणाची सीबीआय आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.
अक्षय गवळी, साम प्रतिनिधी
विमान अपघात होता की घात होता? असा संशय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीमार्फत केला जातोय. अजितदादांचा अपघात नसून घात असावा असा संशय अनेक नेते घेत आहेत. याचदरम्यान या अपघाताबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा खुलासा केलाय.
एका कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरी यांनी बारामती विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती दिलीय. अजित दादांच्या विमान अपघाताच्या ठिकाणी आम्ही पाहणी करायला गेलो, तिथल्या सरपंचाने सांगितलं की, कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करीत होतं. तेव्हा वाचवण्यासाठी गेलो पण तितक्यात विमानाचा ब्लास्ट झाला., असं अमोल मिटकरी म्हणाले. 27 जानेवारीची पूर्ण माहिती घेतली आहे. मंत्रालयाचा कामकाजासाठी मुंबई देवगिरीला गेले होते. पक्षांच्या लोकांना भेटून दादा रात्री आठ वाजता फ्री झाले. देवगिरी बाहेर गाड्या तयार होत्या.
वाहनांनी निघाले असते, तर रात्री दहा वाजेपर्यंत बारामतीत पोहोचले असते. जर रात्रीच दादा निघाले असते तर २ तासात बारामती पोहोचले असते. आज हा विमानाचा अपघात टळला असता. मात्र घात आहे की अपघात? आहे ही मोठी शंका आहे. आजचा सहावा दिवस आहे, दादांच्या मृत्यूचे गूढ अजूनही महाराष्ट्रासमोर कायम आहे.आमदार अमोल मिटकरी यांनी अपघातप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केली आहेत, त्यामुळे अनेकांच्या मनातही संशयाची पाल चुकचूक लागतेय.
विमानातून सहा लोकं प्रवास करत असल्याची माहिती डीजीसीएचने दिलीय पण पोलिसांना प्रत्यक्षात ५ जणांचे मृतदेह सापडली आहेत. पायलटबाबतही मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केलेत, आधी सिंग नावाचा पायलट विमानाचे उड्डाण करणार होता. पण ऐनवेळी कपूर नावाचा पायलट येतो. स्फोट होऊन विमान जळून खाक होतात, पण कागदपत्रे कशी जळत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
अपघातप्रकरणी शंका उपस्थित होते, कारण ज्या कंपनीचे विमान आलं होतं, त्या कंपनीवर 1 वर्षांपासून बंदी होती. काल दादांची ओळख घड्याळमुळे पटल्याची मीडियासमोर शंका व्यक्त केली होती. आज दादांची ओळख पिवळ्या कुर्त्यामुळ पटल्याची सांगण्यात येत आहे. मला शंका आहे, या अपघात प्रकरणाची सीबीआय आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, चौकशी समिती माजी न्यायमूर्तीच्या नेतृत्वात झाली पाहिजे. सीटबेल्ट लावल्याशिवाय दादा गाडीत बसत नव्हते, त्यांचा अशाप्रकारे अपघात होणं, मनाला पटत नसल्याचं मिटकरी म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.