Ajit Pawar plane crash case, Praful Patel has admitted that he made the last phone call saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरणात नव-नवीन खुलासे होत आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी कबूल केले आहे की त्यांनी अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा फोन केला होता.

Bharat Jadhav

  • अजित पवार अपघातापूर्वी शेवटचा कॉल प्रफुल्ल पटेल यांचा

  • शेतकरी विषयावर चर्चा करण्यासाठी कॉल केल्याचा दावा

  • रोहित पवार यांचे घातपाताचे आरोप

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय पवार कुटुंबियांनी घेतलाय. अजित पवार यांच्या विमानाच्या पायटलने जाणूनबुजून अपघात घडवल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केला होता.अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवार यांना एका नेत्याचा कॉल आला होता.

त्या कॉलमुळे अजितदादांना बारामतीला निघण्यास उशिर झाला होता. तो फोन कोणाचा होता, कशासाठी केला होता? असा सवाल रोहित पवार यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत केला होता. आता अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी नवीन माहिती समोर आलीय. ज्या नेत्याने अजित पवार यांना अखेरचा कॉल होता, तो नेता आता माध्यमांसमोर आला आहे.

अजितदादांना अखेरचा कॉल दुसऱ्या कोणत्या नेत्याचा नव्हता तर प्रफुल्ल पटेल यांचा कॉल होता. त्याबाबत खुद्द पटेलांनी आता कबुली दिली आहे. शेतकऱ्यांच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण अजित पवार यांना कॉल होता, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत. अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात संपूर्ण सत्य समोर आलं पाहिजे, ही सुद्धा माझी भूमिका आहे. अजितदादांना शेवटचा फोन मीच केलेला होता.

अनेकजण माझ्या फोन कॉल्सबाबत वावड्या उठवत वेगवेगळे आरोप करत आहेत. मी शेवटचा फोन शेतकऱ्यांच्या बोनस आणि शेतीसंदर्भात दादांना केला होता. मला माहित नव्हतं दादा कुठे होते?. मात्र अपघात घडला ही यात आमची आमच्या पक्षाची महाराष्ट्राची आणि देशाची फार मोठी हानी झालेली आहे. अपघातानंतर या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे लावून धरली. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी लावण्याचे आदेश दिलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT