Ajit Pawar Plane Crash saamtv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death : अजितदादांच्या पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं? ५० कोटींचा तो 'अँगल' आमदाराने सांगितला

Ajit Pawar Death News : अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात नवीन संशयास्पद अँगल समोर आला आहे. पायलटला हिप्नोटाइज केल्याचा आरोप, ५० कोटींच्या विम्याचा मुद्दा आणि विमान अपघाताच्या तपासावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील सर्व अपडेट्स येथे वाचा.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Ajit Pawar plane crash mystery investigation latest updates :राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या निधनावर राज्यातील अनेक नेत्यांकडून संशय़ व्यक्त केला जातोय. यावर मंगळवारी रोहित पवार मोठं भाष्य करणार असल्याचे समोर आलेय. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी आणखी एक संशयाचा अँगल उपस्थित केलाय. अजितदादांच्या विमानाच्या पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं कां? कारण, पायलेटने MAYDAY कॉल दिला नाहीये. टेकऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं, मात्र, तेही त्याने केलं नव्हतं. त्यामुळं आ VSR कंपनीवर म्हाला मोठी शंका आहे. 50 कोटींचा विमा काढून हे कृत्य करायला लावलं कां? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.(Ajit Pawar latest political updates)

VSR कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले. ती कंपनी आधीच दुरूस्त होती, वर्षांभरापासून कंपनीवर बंदी होती. आणि तेच विमान अजितदादांसाठी 28 तारखेला दिल्या गेले. दुसरीकडं, डिसेंबर 2025 च्या महिन्यात VSR कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा कंपनीने उतरवलाय. जर 50 कोटींचा विमा उतरवल्या गेला असेल, आणि जो पायलट वेळेवर बदलला गेला, त्याला हिप्नोटाइज केल होते का?, त्याला आमिष दाखवलं होत कां? असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुपारचा भेटीचा वेळ घेतला आहे. त्यावेळी सविस्तर चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी हिप्नोटाइज करून सुसाईड बॉमरचा वापर केला जातोय. दरम्यान, अजमल कसाब याला दहशतवादी हल्ल्यासाठी पाठविल होतं. दुसरीकडे राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती, त्यावेळी देखील असा प्रयत्न केला गेला होता. पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं कां?, हा मोठा प्रश्न आहे. कारण, पायलेटने MAYDAY कॉल दिला नाही, असा संशय त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

दादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्या पत्र परिषदेकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. मला अपेक्षा आहे 10 तारखेच्या पत्रकार परिषदमध्ये अनेक गोष्टी कव्हर होतील. जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते सादर करतील. त्यामुळेच रोहित पवारांची पत्रकार परिषद पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं, असे मिटकरी म्हणाले. सुनेत्रा वहिनी ह्याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील. त्याच अध्यक्ष झाल्या पाहिजे आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित दादासाठी जो कार्यकर्ता रडला, जीवापाड दादांवर प्रेम केलंये, अजितदादा केल्यानंतर आजही ज्याच्या घरात सुतक आहे. ते कार्यकर्ते पण महत्वाचे आहे. अजित दादा नंतर त्या जागेचा अधिकार सुनेत्रा वहिनींनाच आहे. त्यामुळे प्रस्तावाची भाषा कोणीही करू नये, असे मिटकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Price Today : सीएनजीसारखेच रात्रीत एलपीजी गॅसचे दर बदलले? घरगुती सिलिंडर बुक करण्याआधी दर वाचाच

Pravin Tarde-Deool Band 2 : स्वामींचे तेजस्वी रूप पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध; 'देऊळ बंद २' सुसाट, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची ५ व्या दिवशी कमाई किती?

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

Onion: मातीमोल कांदा, खिशाला भुर्दंड; कांदा अजून किती दिवस शेतकऱ्याला रडवणार?

Shocking : हृदयद्रावक! आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या ३ नातींवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT