बारामती विमानतळावर नियमित एटीसी सुविधा नसल्याचं DGCA अहवालात स्पष्ट.
विद्यार्थ्यांकडून एअर ट्रॅफिक कंट्रोल चालवल्याची धक्कादायक बाब समोर.
अपघाताच्या दिवशी हवामान व नेव्हिगेशन सुविधांमध्ये त्रुटी.
बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारीच अजित पवार यांचं विमान कोसळलं होतं. या अपघातात अजितदादांचा निधन झालं. दरम्यान दुर्घटनेच्या एका महिन्यानंतर DGCAने आपला प्राथमिक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार विमानतळावर अनकंट्रोल्ड एअरफिल्ड, नियमित ATC सुविधा नाहीये. तसेच अजित पवारांच्या अपघाताच्या घडला त्या दिवशी हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. आता बारामती विमानतळासंदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे.
बारामतीचे विमानतळ "अनियंत्रित" च होते असा नवा खुलासा झालाय. विमानतळाचे एअर ट्रॅफिक कंट्रोलर हे विद्यार्थ्यांकडून चालवले जात होते. विमान उड्डाण प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एटीसीचा वापर आणि देखभाल केली जाते. व्हीआयपी विमानांसाठी सुद्धा एटीसी टॉवर संस्थांच्या प्रशिक्षकांद्वारे आणि विद्यार्थ्यांकडून चालवले जात असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून आता समोर आलीय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि एएआयबीने दिलेल्या अहवालातून माहिती स्पष्ट झालीय. विमान उड्डाण प्रशिक्षण कार्यासाठी विमानतळाचा प्रामुख्याने वापर होतो, येथे दोन फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स (FTOs) यांचा येथे बेस आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय दिलेल्या अहवालात दोन्ही वैमानिकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार अजित पवार यांच्या विमानातील दोन्ही पायलट अनुभवी होते. दोन्ही वैमानिकांना बारामती विमानतळावर विमान उतरवण्याचा अनुभव होता. पायलट इन कमांड आणि फर्स्ट ऑफिसर या दोघांनी यापूर्वी बारामती विमानतळावर विमान उतरवले होते. अजितदादांच्या वैमानिकाला बारामती विमानतळाची भौगोलिक परिस्थिती माहिती होती. यापूर्वी या दोन्ही वैमानिकांनी अनेक खाजगी आणि व्हीआयपी लोकांच्या विमानांते उड्डाण केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.