Ajit Pawar On Baramati  Saam Digital
महाराष्ट्र

Ajit Pawar On Baramati : अरे बापरे! बारामती म्हणायचीही भीती वाटू लागलीये; अजित पवार असं का म्हणाले?

Maharashtra Politics : पुण्यातील कसबा येथील मानाच्या गणपतीचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी बारामतीचं नावही घ्यायला मला आता भीती वाटायला लागली, असं मिश्किल उत्तर दिलं आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीत बारामतीत पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्यांना पराभव समोर दिसत असल्याचं म्हटलं होतं. पत्रकारांनी आज त्यावर विचारलेल्या प्रश्नावर आज अजित पवारांनी, अरे बाप रे! मला आता बारामती सुद्धा म्हणायची पण भीती वाटायला लागली, असं मिश्किल उत्तर दिलं आहे. पुण्यातील कसबा येथील मानाच्या गणपतीचं आज त्यांनी दर्शन घेतलं, यावेळी ते बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सुप्रीया सुळे यांचा या निवडणुकीत मोठा विजय झाला. अजित पवार यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. चार पैकी एक जागा निवडून आली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती. या पराभवानंतर अजित पवार गटाकडून चिंतन सुरू असताना अजित पवार यांनी बारामतीकरांना आता दुसऱ्या आमदाराची गरज आहे, असं विधान करत बारामतीत न लढण्याचे संकेत दिले आहेत.

संजय राऊत यांनी त्यांच्या या विधानवर प्रतिक्रिया देताना, अजित पवार यांचा लोकसभेत पराभव झाला आता विधानसभेतही पराभव होणार आहे. आणि त्यांचा हा पराभव निश्चित आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला. पित्यासमान असलेल्या शरद पवार यांनी त्यांना सर्व काही दिलं. मात्र त्यांच्या पाटीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता त्याची फळ त्यांना भोगावी लागणार असंही त्यांनी म्हटलं होतं.

अमित शहा आणि आमच्या बद्दलच्या चर्चा खोट्या

अमित शहा आणि आमच्या बद्दलच्या चर्चा झाल्या त्या खोट्या आहेत. मला त्यांना रात्री भेटता आले नाही. आम्हाला दुसऱ्या दिवशी वेळ दिला होता. त्यावेळी आम्ही राजकीय चर्चा केली. इतर शेती विषयक चर्चा सुद्धा आम्ही केली.राज्यातील अनेक ठिकाणी खूप पाऊस झाला त्यात अनेक भागात नुकसान झालं. मात्र जवळपास सर्व धरणं १०० टक्के भरली आहेत. जायकवाडी कधी भरत नाही पण यंदा सगळे समाधानी आहेत या सुद्धा चर्चा झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

बारामतीचा गब्बर कोण असे फ्लेक्स लागले होते, त्यावर अजित पवार म्हणाले, चालायचं!! इतक्या लहान गोष्टीमध्ये लक्ष द्यायची गरज नाही.आमची महायुती आहे, खालच्या प्रत्येक लोकांकडे लक्ष देता येत नाही.या लोकांना तुम्ही प्रसिध्दी देता कारण नसताना युतीमध्ये अंतर आहे का असा प्रयत्न केला जातो, असं म्हणत त्यांनी माध्यमांनाही जबाबदार धरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT