Sharad Pawar Vs Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

NCP Symbol Case: राष्ट्रवादीचं घड्याळ जाणार? 'अजित पवारांना नवं चिन्ह द्या', शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका

Sharad Pawar Vs Ajit Pawar: निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नवीन चिन्हं देण्याची मागणी करणारी याचिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात केलीय त्यामुळे राष्ट्रवादीत घड्याळावरुन पुन्हा घमासान होण्याची चिन्ह आहेत.

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यताय..मात्र त्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टेंशन वाढलंय. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय़. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेचा जोपर्यंत निकाल लागत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरू देऊ नका अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. नेमकं या याचिकेत काय मागणी केलीय हे जाणून घेऊ...

राष्ट्रवादीचं घड्याळ जाणार?

शरद पवारांच्या पक्षाकडून शुक्रवारी सुप्रीम कोर्टात मागणी केली की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह द्या. निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्यास बंदी घाला. अजित पवारांना नव्या चिन्हाची मागणी करण्यास सांगावं. या प्रकरणावर 25 सप्टेंबरला सुनावणीची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा फटका बसला होता. शरद पवार गटाला निवडणुकीत तुतारी हे चिन्हं मिळालं. तर काही अपक्षांना तुतारी सदृश्य ट्रंपेट हे चिन्ह मिळालं होतं.

या चिन्हामुळे मतदार संभ्रमीत झाला आणि शरद पवारांची मतं अपक्षांना मिळाली होती. विधानसभेत हा घोळ टाळण्यासाठी आणि अजित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी शरद पवारांकडून हा नवा डाव टाकण्यात आलायं.

यापूर्वी सुप्रीम कोर्टानं ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता. मात्र यावेळी ही याचिका दाखल करून घेतल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धाकधूक वाढलीय. त्यामुळे घड्याळाची टिक टिक विधानसभेत सुरू राहणार की नाही हे पाहण्यासाठी सा-या राज्याचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama : 'बिग बॉस मराठी' सुरू होण्याआधीच अशोक मामांची एक्झिट; मालिकेचा शेवट कसा होणार? पाहा VIDEO

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

SCROLL FOR NEXT