Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : दिंडोरीत मुंबईतील 'वायकर पॅटर्न'; नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार का?

Dindori News in Marathi : दिंडोरीत अजित पवारांना धक्का बसला आहे. नरहरी झिरवाळांच्या सुपुत्राची शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरु केली आहे. लोकसभा निकालानंतर सर्व राजकीय नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेकांनी विधानसभेच्या तिकीटासाठी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. याचदरम्यान, नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांनी शरद पवारांच्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली आहे. झिरवाळ यांच्या चिरंजीवांनी शरद पवारांच्या मेळाव्याला हजेरी लावल्याने दिंडोरीत अजित पवारांना धक्का बसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर दिंडोरीत मुंबईचा वायकर पॅटर्न लागू होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरहरी झिरवाळ यांच्या चिरंजीवांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. या हजेरीनंतर नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव शरद पवार गटातून विधानसभा निवडण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मुलाने शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी प्रदेशाध्यक्षांकडे उमेदवारी मागितली.

गोकुळ यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ या मतदारसंघासाठी जयंत पाटील यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत गोकुळ झिरवाळांकडून आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू, असं वक्तव्य केलं आहे. यामुळे नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर झिरवाळ यांचे चिरंजीव काय म्हणाले?

शरद पवार गटाच्या निष्ठावंत मेळाव्याला लावलेल्या हजेरीविषयी गोकुळ झिरवळ यांनी भाष्य केलं आहे. गोकुळ झिरवळ म्हणाले, ' लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार भगरे यांना निवडून आणले. वडिलांची निष्ठा दुसऱ्यावर आहेत. कुटुंब व्यवस्था वेगळं आणि राजकारण वेगळं असतं. त्यांची अजित पवार यांच्यावर आणि माझी शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे. नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांच्याकडे यावे. श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणूका सुरू आहेत. भगरे सर यांचे नाव असल्याने ते उमेदवार होते. कार्यकर्त्याची इच्छा होती की भगरे सर यांच्याबरोबर राहायचे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT