Maratha Reservation : शरद पवार हे मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावताहेत; लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप

Laxman Hake on Sharad Pawar : शरद पवार साहेब ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
शरद पवार हे मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावताहेत; लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप
Laxman Hake on Sharad PawarSaam TV
Published On

महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पार्टी) सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी (ता.२२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटं चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा विषय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या यावर ही चर्चा झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान, या भेटीनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शरद पवार हे मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावताहेत; लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप
Maharashtra News : एकनाथ शिंदेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील; शिंदे गटाच्या खासदाराचा सर्वात मोठा दावा, VIDEO

शरद पवार (Sharad Pawar) साहेब ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आमच्या एसटीच्या आरक्षणासाठी चार पिढ्या खपल्या आणि आता शरद पवार म्हणत आहेत आमचा पाठिंबा आहे. त्यांनी एकदाची आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. ते बीडच्या चकलंबा गावात ओबीसी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा विषय चांगलाच चिघळलाय. राज्य सरकारने तातडीने सगेसोयऱ्यांची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी केली आहे. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे.

दुसरीकडे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना ओबीसीत समाविष्ट करून घेऊ नका, अन्यथा मोठं आंदोलन करू, असं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी म्हटलंय. यासाठी त्यांनी ठिकठिकाणी ओबीसी मेळावे देखील घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी लक्ष्मण हाके हे बीडच्या चकलंबा गावात आले होते. यावेळी त्यांनी ओबीसी बांधवांना संबोधित केलं.

लक्ष्मण हाके म्हणाले की, "मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लागलेली असताना शांत बसत आहेत. शरद पवार साहेबांनी पुरोगामी भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यांच्या तोंडी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचे नाव असते. जरांगे ज्यावेळी आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ आहे असं म्हणतात. त्याचवेळी शरद पवार संधी साधतात".

"बारामतीमध्ये शरद पवार पिवळा रुमाल घालून, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमात जावून, धनगरांच्या एसटी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असं सांगतात. पण आमच्या चार पिढ्या या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यावेळी त्यांची काहीच भूमिका नाही. त्यांनी आमच्यामध्ये भांडण लावू नये", असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही शरद पवार का बोलतं नाहीत, ते का मूग गिळून गप्प आहेत. मुख्यमंत्र्याकडे मीटिंगला जाऊन शरद पवार फक्त पोहे खाऊन आले का ? गावगाडा विस्कळीत होत असताना बोलत नाहीत, हे न कळलेलं कोड आहे, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

Edited by - Satish Daud

शरद पवार हे मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावताहेत; लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप
Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com